मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ झुकला इस्रायल, वाचा 100 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ झुकला इस्रायल, वाचा 100 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं

इस्रायलमध्ये भारतीय सैनिकांनी केलेल्या धाडसी (Tribute to India soldiers who fought for Israel) कामगिरीबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

इस्रायलमध्ये भारतीय सैनिकांनी केलेल्या धाडसी (Tribute to India soldiers who fought for Israel) कामगिरीबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

इस्रायलमध्ये भारतीय सैनिकांनी केलेल्या धाडसी (Tribute to India soldiers who fought for Israel) कामगिरीबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

  • Published by:  desk news

जेरुसलेम, 7 ऑक्टोबर : इस्रायलमध्ये भारतीय सैनिकांनी केलेल्या धाडसी (Tribute to India soldiers who fought for Israel) कामगिरीबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. इस्त्रायलच्या उत्तरेला असणाऱ्या हायफा शहरात (Haifa city in Israel) हा कार्यक्रम पार पडला. 100 वर्षांपूर्वी जेव्हा इस्रायलवर ऑटोमन साम्राज्य होतं, तेव्हा (Indian soldiers fought against automan empire) भारतीय सैनिक इस्रायलच्या बाजूने लढले होते आणि हायफावासियांना त्यांनी बंधनातून मुक्त केलं होतं. या लढ्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांबाबत आजही इस्रायलमध्ये कृतज्ञता बाळगली जाते आणि दरवर्षी त्यांना अभिवादन केलं जातं.

काय झालं होतं 100 वर्षांपूर्वी?

साधारण शंभर वर्षांपूर्वी ऑटोमन साम्राज्याविरोधात भारतीय सैनिकांनी लढा दिला होता. इस्रायलसाठी भारतीय  सैनिक मदत करत होते. ऑटोमन काळातील घोड्यावरून लढलं गेलेलं शेवटचं मोठं युद्ध, असं या घटनेचं वर्णन इतिहासकार करतात. भारतीय सैन्याच्या मैसूर, हैदराबाद आणि जोधपूर या तीन रेजिमेंट्समधील सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 23 डिसेंबरला ‘हायफा डे’ साजरा केला जातो.

हे वाचा - असं होतं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट, उत्खननात सापडलं ‘नवकोट नारायणा’चं शौचालय

इस्रायलमध्ये कार्यक्रम

हायफातील भारतीय स्मशानभूमीत एक जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारताचे इस्त्रायलमधील राजदूत संजीव सिंगला यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. घोड्यांवरून तलवारी आणि भाल्यांच्या मदतीने भारतीय सैनिकांनी सशस्त्र ऑटोमन सैनिकांचा पाडाव करण्याची कामगिरी केल्याचं ते म्हणाले. शत्रूकडे त्या काळातील आधुनिक शस्त्रास्त्रं असताना आणि शत्रू सैनिक डोंगरांवरून हल्ला करत असतानाही भारतीय सैनिकांनी केवळ घोडेस्वारी करत भाला आणि तलवारी वापरून त्यांचा पराभव केला होता. अशा प्रकारे लढलं गेलेलं हे त्या काळातील शेवटचं युद्ध होतं. हायफा शहराला स्वतंत्र करण्यात त्या युद्धाचा मोठा वाटा असल्यामुळे हे योगदान कधीही विसरणार नसल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे.

सैनिकांनी दाखवलेली बहादुरी आणि परक्या प्रांतात, परकीयांना दिलेलं वचन पाळण्यासाठी पत्करलेलं हौतात्म्य यामुळे भारताची प्रतिष्ठा आणि गौरव जगभरात वाढल्याचंही सिंगला यांनी म्हटलं.

First published:

Tags: India, Israel, War