Home /News /ahmednagar /

आधी खाली पाडलं मग नाक दाबून तोंडात ओतलं विष, नगरमध्ये निवृत्त पोलिसासोबत सुनेचं अमानुष कृत्य

आधी खाली पाडलं मग नाक दाबून तोंडात ओतलं विष, नगरमध्ये निवृत्त पोलिसासोबत सुनेचं अमानुष कृत्य

poison

poison

Crime in Ahmednagar: पाथर्डी तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेनं दोघांच्या मदतीने आपल्या सासऱ्याला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to murder) केला आहे.

    अहमदनगर, 12 जानेवारी: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेनं दोघांच्या मदतीने आपल्या सासऱ्याला विष पाजून (Give poison to drink) जीवे मारण्याचा प्रयत्न केला (daughter in law attempt to murder father in law) आहे. विशेष म्हणजे पीडित सासरे हे सेवानिवृत्त पोलीस आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित सासऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुनेसह अन्य दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. ग्यानदेव नामदेव जाधव असं 60 वर्षीय फिर्यादी सासऱ्यांचं नाव आहे. ते बोल्हेगाव येथील गांधीनगर परिसरातील रहिवासी आहेत. तर सून सोनाली संतोष जाधव, वैभव ऊर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. संबंधित सर्वजण अहमदनगर तालुक्यातील वडगाव गुप्ता परिसरातील शेंडी बायपास येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-  मंदिरातील पुजाऱ्यात संचारला राक्षस; धारदार तलवारीने सुनेचे छाटले दोन्ही हात, देशाला हादरवणारी घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी फिर्यादी जाधव हे पाथर्डी तालुक्यातील मोहोज येथून आपल्या मुलाकडे दुचाकीने चालले होते. दरम्यान कोल्हार घाटमार्गे शेंडीबायपासने वडगाव गुप्ता शिवारातील नदीजवळून जात असताना, त्यांची सून सोनाली हिने हात दाखवून जाधव यांची दुचाकी थांबवली. यावेळी फिर्यादी जाधव आपली दुचाकी डबल स्टॅन्डवर लावत होता. दरम्यान सुनेनं अचानक फिर्यादी जाधव यांना खाली पाडलं आणि ती जाधव यांच्या पायावर बसली. हेही वाचा-25 वर्षीय नर्सवर डॉक्टरकडून बलात्कार; मित्रांनीही साधली संधी, औरंगाबादमधील घटना यावेळी आरोपी बाळासाहेब याने जाधव यांचे हात धरले आणि वैभव याने जाधव याचं नाक दाबून त्यांच्या तोंडात विष ओतलं. तू निवृत्त पोलीस असल्याने तुझ्यावर मी दाखल केलेल्या गुन्ह्यात तुला पोलीसांनी अटक केली नाही. आता इथे तुला कोण वाचवणार? असं म्हणत सुनेसह अन्य दोघांनी फिर्यादी जाधव यांना शिवीगाळ केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर जाधव यांना अहमदनगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जावून जाधव यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Crime news

    पुढील बातम्या