Home /News /national /

मंदिरातील पुजाऱ्यात संचारला राक्षस; धारदार तलवारीने सुनेचे छाटले दोन्ही हात, देशाला हादरवणारी घटना

मंदिरातील पुजाऱ्यात संचारला राक्षस; धारदार तलवारीने सुनेचे छाटले दोन्ही हात, देशाला हादरवणारी घटना

Crime News: मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या सुनेसोबत अमानुष कृत्य केलं आहे. आरोपी सासऱ्याने किरकोळ घरगुती कारणातून आपल्या सुनेचे दोन्ही हात छाटले (Father in law attacked on daughter in law) आहेत.

    विदिशा, 12 जानेवारी: मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या सुनेसोबत अमानुष कृत्य केलं आहे. आरोपी सासऱ्याने किरकोळ घरगुती कारणातून आपल्या सुनेचे दोन्ही हात छाटले (cut daughter in law's both hands with sword) आहेत. पीडित सून आपल्या घरात देवाची पूजा करत असतानाच आरोपीनं धारदार तलवारीने सुनेवर हल्ला (Father in law attacked on daughter in law) केला आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, पीडित सुनेचे दोन्ही हात मनगटापासून तुटले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. संबंधित घटना मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील आहे. तर कैलाश नारायण चतुर्वेदी असं अटक केलेल्या 80 वर्षीय नराधम सासऱ्याचं नाव आहे. तो विदिशा किल्ल्यातील मंदिरात पुजारी आहे. आरोपी चतुर्वेदी याचं काही दिवसांपूर्वी सून सीमा हिच्यासोबत घराच्या ओट्यावरून वाद झाला होता. अगदी लग्नापासूनचं सासरच्या मंडळींचं सुनेसोबत पटत नव्हतं. सून नोकरी आणि अभ्यास करते, हेही सासऱ्याला बघवत नव्हतं. यातूनच आरोपी सासऱ्याने मंगळवारी आपल्या सुनेवर प्राणघातक हल्ला केला आहे. हेही वाचा-समाजकार्यासाठी बोलावून विवाहितेला अडकवलं जाळ्यात; 10महिने सुरू होता भयंकर प्रकार घटनेच्या दिवशी सून सीमा ही घरात देवपूजा करत होती. यावेळी आरोपी सासरा चतुर्वेदी यानं धारदार तलवारीने सुनेच्या डोक्यात पाठीमागून हल्ला केला. यावेळी सुनेनं बचावासाठी आपल्या हाताने तलवार रोखण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सुनेचे दोन्ही हात पुर्णपणे कापले गेले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की, सुनेचे दोन्हा हाताचे मनगट लटकत होते. यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत, गंभीरावस्थेत जखमी झालेल्या सुनेला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. हेही वाचा-25 वर्षीय नर्सवर डॉक्टरकडून बलात्कार; मित्रांनीही साधली संधी, औरंगाबादमधील घटना पण तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला भोपाळ याठिकाणी हलवण्यात आलं आहे. येथील एका खाजगी रुग्णालयात पाच डॉक्टरांच्या पथकाने 9 तास गुंतागुतीची शस्त्रक्रिया करून महिलेचे दोन्ही हात पुन्हा जोडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. पीडितेवर भयंकर हल्ला केल्यानंतर देखील आरोपी सासरा जराही घाबरला नव्हता. तो घटनास्थळीच बसून 'आपण पोलिसांना घाबरत नाही' असं म्हणत असल्याचं  प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तो कोणताही विरोध न करता पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh

    पुढील बातम्या