जाहिरात
मराठी बातम्या / देश / ट्रेनमध्ये बसताच पत्नीचा मृत्यू, पतीला कल्पनाही नव्हती; मृतदेहासोबत केला 500 KM प्रवास अन् मग..

ट्रेनमध्ये बसताच पत्नीचा मृत्यू, पतीला कल्पनाही नव्हती; मृतदेहासोबत केला 500 KM प्रवास अन् मग..

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात राहणारा नवीन हा त्याची पत्नी उर्मिलाला उपचारासाठी लुधियानाला घेऊन गेला. लुधियानाहून बिहारला जाण्यासाठी ते मयूरध्वज ट्रेनमध्ये बसले होते. मात्र…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लखनऊ 18 सप्टेंबर : लुधियाना रेल्वे स्थानकावरून एक माणूस आपल्या पत्नीसह ट्रेनमध्ये चढला. मात्र, प्रवासातच त्याची बायको मरण पावली आणि त्याला याचा पत्ताही लागला नाही. त्याने पत्नीच्या मृतदेहासह सुमारे 500 किमीचा प्रवास केला. जेव्हा टीटीई तिकीट मागायला आला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. रागाच्या भरात तरुणाने सख्ख्या भावालाच संपवलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात राहणारा नवीन हा त्याची पत्नी उर्मिलाला उपचारासाठी लुधियानाला घेऊन गेला. लुधियानाहून बिहारला जाण्यासाठी ते मयूरध्वज ट्रेनमध्ये बसले होते. मात्र, काही किलोमीटर प्रवास करताच त्याच्या पत्नीचा रेल्वेतच मृत्यू झाला. मात्र, आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं नवीन यांना माहीत नव्हतं. त्यांनी पत्नीच्या मृतदेहासोबत सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास केला. नवीन सांगतात की, त्यांची पत्नी ट्रेनमध्ये चढल्यानंतर झोपी गेली होती आणि झोपेतच पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना याबद्दल काहीही कळू शकलं नाही. वसई : सुटकेसमध्ये शीर नसलेला कुजलेला मृतदेह, DNA चाचणी अन् अखेर एका वर्षाने गुन्ह्याची उकल; पती अटकेत जेव्हा टीटीईने नवीनकडे ट्रेनमध्ये तिकीट मागितलं तेव्हा त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं त्याला समजलं. ही बाब लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी शहाजहानपूर जीआरपीला माहिती दिली. त्यानंतर शहाजहानपूर रेल्वे स्थानकावर मृतदेह उतरवण्यात आला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. मात्र, पतीने नकळत आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत तब्बल 500 किलोमीटर प्रवास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. पोलीस सध्या याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात