जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / रागाच्या भरात तरुणाने सख्ख्या भावालाच संपवलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार

रागाच्या भरात तरुणाने सख्ख्या भावालाच संपवलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार

रागाच्या भरात तरुणाने सख्ख्या भावालाच संपवलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार

आकाश आणि तेजस हे दोघे सख्खे भाऊ होते.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 18 सप्टेंबर : राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातही हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भाऊ हा संकटात मदत करणारा असतो. मात्र, पुण्यात एका भावाने आपल्या लहान भावाची हत्या केल्याची खळबळजन घटना समोर आली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केला. काय आहे संपूर्ण प्रकरण - हत्येची ही घटना कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगरमधील माउली निवास येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तेजस यशवंत भोसले, असे 25 वर्षीय मृताचे नाव आहे. याबाबत आई सुनीता यशवंत भोसले (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी आकाश यशवंत भोसले (वय 29, रा. टिळेकरनगर कोंढवा) याला अटक केली आहे. मृत रेकॉर्डवरील गुन्हेगार - आकाश आणि तेजस हे दोघे सख्खे भाऊ होते. यातील तेजस हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याला दारूचेही व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो घरातल्या लोकांना शिवीगाळ करत असे. त्याच्या अशा वागण्यामुळे आकाश हा त्याच्यापासून दुसरीकडे वेगळा राहत होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला होता. यानंतर तो घरातील लोकांना शिवीगाळ करून मारहाण करू लागला होता. यामुळे त्याच्या आईने ही माहिती आकाशला दिली. यानंतर आकाश तेथे आला होता आणि यावेळी दोघांत वाद झाला. तसेच आकाशने तेजसला मारहाण करून रागाच्या भरात त्याचा गळा दाबून ढकलून दिले. त्यांना वाटले दारू पिल्यामुळे तो पडला आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. हेही वाचा -  पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, घरमालकाने दिली धक्कादायक माहिती सकाळी तेजसला घरच्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठला नाही. त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तेजस याच्या शवविच्छेदन अहवालातून त्याचा गळा दाबून आणि ढकलून दिल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मृताच्या आईने दिलेल्या या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी आकाश यशवंत भोसले (वय 29, रा. टिळेकरनगर कोंढवा) याला अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात