पालघर 18 सप्टेंबर : पालघर जिल्ह्यातील वसई पोलिसांनी 26 जुलै 2021 रोजी भुईगाव समुद्रकिनारी सुटकेसमध्ये शील नसलेला मृतदेह सापडल्याच्या प्रकरणाची अखेर उकल केली आहे. या हत्येप्रकरणी मृत महिलेच्या पतीला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीत फेकून दिला होता. आरोपीने आपला गुन्हा लपवण्यासाठी पत्नी हरवल्याची तक्रारही दाखल केली नाही. मात्र 29 ऑगस्ट रोजी मृत सानियाच्या नातेवाईकांनी कर्नाटकातील बेळगावहून येऊन नालासोपारा येथील आचोळ पोलीस ठाण्यात सानिया बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. वसई पोलिसांनी मयत सानियाची आणि तिच्या मुलाची डीएनए चाचणी करून प्रकरणाची उकल केली. चौकशीनंतर मृत महिलेचा पती आसिफ याला अटक करण्यात आली. पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, घरमालकाने दिली धक्कादायक माहिती 26 जुलै 2021 हा तो दिवस होता जेव्हा मुंबईला लागून असलेल्या वसईतील भुईगाव परिसरात सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता. अनेक दिवस सुटकेसमध्ये राहिल्यामुळे मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवला आणि वसई पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चार पथके तयार केली होती. मात्र महिलेचं शीर सापडलं नव्हतं. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं अवघड झालं होतं. 29 ऑगस्ट 2022 रोजी सानिया नावाची 24-25 वर्षीय महिलेच्या बेपत्ता झाल्याची तक्रार आचोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. ही तक्रार तिच्या बेळगाव, कर्नाटक येथील नातेवाईकांनी दिली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी वसई विरारमध्ये वर्षभरात आढळलेल्या महिलांच्या मृतदेहांची ओळख पटवत प्रकरणाची उकल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सानियाचं चित्र समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या चित्रासोबत मिळतं-जुळतं असल्याचं लक्षात आलं. हिजाब घातला नाही म्हणून पोलिसांकडून भयंकर शिक्षा, 22 वर्षीय अमिनीचा दुर्देवी मृत्यू जेव्हा पोलिसांनी सानियाचा डीएनए आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीचा डीएनए तपासला तेव्हा हा मृतदेह सानियाचाच असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी याप्रकरणी सानियाच्या पतीची कडक चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला. चारित्र्यावर संशय घेऊन त्याने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. तिचं धड पिशवीत टाकून वितरण नदीत फेकून दिलं आणि तो मुंब्रा येथे राहायला गेला. याप्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.