Home /News /national /

आता सर्वसामान्य नागरिकही थेट पंतप्रधानांकडे करू शकतील तक्रार; अतिशय सोपी आहे प्रक्रिया

आता सर्वसामान्य नागरिकही थेट पंतप्रधानांकडे करू शकतील तक्रार; अतिशय सोपी आहे प्रक्रिया

पंतप्रधानांनी सामान्य नागरिकांच्या तक्रारी थेट आपल्यापर्यंत पोहोचू शकतील अशी यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत (PMO- Prime Minister’s Office) पोहोचवू शकतात

नवी दिल्ली 26 ऑगस्ट : ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही उक्ती आपल्याकडे प्रचलित आहे. अनेकदा सरकारी यंत्रणेतील (Government System) अडथळ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची (Citizen) छोटी मोठी कामे होण्यासही खूप वेळ लागतो. अनेकदा हेलपाटे मारूनही काम होत नाही. वेळ, पैसा खर्च होतोच; पण मनस्तापही होतो. अशा वेळी आपल्या अडचणीची कोणीतरी दखल घ्यावी आणि ती चुटकीसरशी सोडवली जावी, इतकीच सामान्य नागरिकाची अपेक्षा असते; मात्र बहुतांश वेळा सर्वसामान्य माणसाचा कोणीही वाली नसतो, याचीच जाणीव प्रकर्षाने होते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर त्यांनी हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला आहे. देशाचे प्रमुख असलेल्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचणं तसे सर्वसामान्य नागरिकाला दुरापास्तच असतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी सामान्य नागरिकांच्या तक्रारी थेट आपल्यापर्यंत पोहोचू शकतील अशी यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत (PMO- Prime Minister’s Office) पोहोचवू शकतात. यामुळे कोणाला केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नसेल तर थेट उच्च अधिकारी किंवा केंद्र सरकारच्या पोर्टलवर (Central Government Portal) तक्रार दाखल करता येते. विशेष म्हणजे ही सुविधा ऑफलाइन आणि ऑनलाइनही (Online) उपलब्ध आहे. एबीपी लाईव्ह हिंदी ईपेपरनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. दिराने केला नको तो हट्ट, वहिनीने मग लाटण्यानेच चोपलं; VIDEO VIRAL पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाइन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. अवघ्या काही मिनिटात तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. ही प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. - तक्रार नोंदवण्यासाठी प्रथम तुम्हाला पंतप्रधान कार्यालयाची अधिकृत वेबसाइट https://www.pmindia.gov.in/en वर भेट द्यावी लागेल. - येथे तुम्हाला एक ड्रॉप डाउन मेनू दिसेल ज्यावर ‘पंतप्रधानांना लिहा’ यावर क्लिक करा. - येथून तुम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे कोणतीही तक्रार ऑनलाइन पाठवू शकता. - आता CPGRAMS पेज उघडेल. - या पेजवर तक्रारी दाखल करता येतात. - तक्रार नोंदवल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल. - नंतर तुम्हाला तक्रारीशी संबंधित बातम्यांची कात्रणं, कागदपत्रं अपलोड करावी लागतील. - विचारलेली सर्व माहिती भरा. - तुमची तक्रार नोंदवली जाईल. सोशल मीडियावरील 'हे' चॅलेंज तुम्हीही स्वीकारताय? मग गंभीर परिणाम वाचाच ऑनलाइन पद्धतीनं तक्रार नोंदवणे काही कारणाने शक्य नसेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीनंही तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्ही तुमची तक्रार पोस्टाने पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकता. ‘पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली - 110011. या पत्त्यावर पत्र पाठवता येईल. फॅक्सद्वारे तक्रारही नोंदवता येते. याकरता 011-23016857 या फॅक्स क्रमांकावर फॅक्स पाठवता येईल.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Pm narenda modi, Pmo

पुढील बातम्या