नवी दिल्ली 26 ऑगस्ट : सोशल मीडियाचा (Social Media) वापर जेव्हापासून प्रचंड वाढला आहे, तेव्हापासून वेगवेगळ्या चॅलेंजचा ट्रेंड सोशल मीडियावर आल्याचं पाहायला मिळतं. हे चॅलेंज पूर्ण करून अनेकजण सोशल मीडियावर स्टार बनतात. हे चॅलेंज प्रचंड व्हायरलदेखील होतात. मागील वर्षीपासून कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) काळात अनेक नवनवे चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल (Viral Social Media Challenge) झाल्याचं पाहायला मिळालं, याला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. सध्या असंच एक नवं चॅलेंज आलं आहे, हे पाहून असं जाणवतं की लोकांना स्वतःच्याच शरीरासोबत खेळ करण्यातही आनंद मिळत आहे.
VIDEO : महिलेनं ऑनलाइन ऑर्डर केलेलं सामान घेऊन पळालं अस्वल; यात असं काय होतं?
आम्ही बोलत आहोत सध्या चर्चेत असलेल्या ‘मिल्क क्रेट चॅलेंज'बद्दल (Milk Crate Challenge). तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर या चॅलेंजबद्दल नक्कीच ऐकलं असेल. जर तुम्ही याबद्दल ऐकलं नसेल तर आम्ही याबद्दल आज माहिती देत आहोत. टिकटॉकवर सुरू झालेलं हे चॅलेंज सध्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर भरपूर प्रसिद्ध झालं आहे. लोक हे चॅलेंज ट्राय करत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या चॅलेंजमध्ये तुम्हाला दुधाच्या पॅकेटचा प्लास्टिकचा जबा म्हणजे मिल्क क्रेट एकावर एक या पद्धतीनं पायऱ्यांप्रमाणे ठेवायचे आहे आणि यानंतर आपण ज्याप्रमाणे पायऱ्यांवर चढतो, त्याप्रमाणे या क्रेटवर एक एक पाय पुढे ठेवायचा आहे. हे चॅलेंज पूर्णपणे संतुलनावर आधारित आहे. जो व्यक्ती संतुलन करत क्रेटच्या शेवटच्या पायरीपर्यंत चढतो तो हे चॅलेंज जिंकतो.
The internet be fucking me up man Legendary Roller , #WhiteMike became the 1st person to complete the Milk Crate Challenge while rolling a blunt #CrateChallenge #Laughs #Humor pic.twitter.com/shbNSuaYaZ
— uncle greg (@UncleTweets) August 22, 2021
Shorty raised the stakes pic.twitter.com/z3sVh3Wh7H
— Dee Goodz (@dee_goodz) August 23, 2021
— rickie jacobs (@airjacobs) August 23, 2021
VIDEO - मुंगूसापेक्षाही भारी पडला कोंबडा! प्रतिकार दूर सापाने भीतीनेच ठोकली धूम
या चॅलेंजचे हजारो व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. मात्र, यातील ते व्हिडिओ अधिक व्हायरल होत आहेत ज्यात व्यक्ती हे चॅलेंज पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. म्हणजे जो क्रेटवर चढताना खाली कोसळतो. क्रेटवरून पडतानाचे अनेक जणांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पाहून तुम्हालाही असा प्रश्न पडेल की या लोकांचं स्वतःच्या शरीरावर प्रेम नाहीये का ? ते यामुळे कारण अनेकजण अत्यंत वाईट पद्धतीनं यावरुन कोसळताना दिसत आहेत. यात त्यांना मारही लागत आहे मात्र लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे चॅलेंज स्विकारत आहेत. यूएसए टुडेसोबत बातचीत करताना जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयाच्या ऑर्थोपॅडिक सर्जरीचे प्रोफेसर डॉ. रजविंदर देओ यांनी सांगितलं, की हे चॅलेंज अत्यंत धोकादायक आहे. यात भाग घेणाऱ्यांना डोक्याला तसंच शरीराच्या इतर भागांवर गंभीर मार लागण्याची शक्यता असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.