• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • दिराने केला नको तो हट्ट, वहिनीने मग लाटण्यानेच चोपलं; VIDEO VIRAL

दिराने केला नको तो हट्ट, वहिनीने मग लाटण्यानेच चोपलं; VIDEO VIRAL

वहिनीने दिराला दिला चोप.

वहिनीने दिराला दिला चोप.

दिराने वहिनीकडे असं काही मागितलं की वहिनी त्याच्यामागे हातातलं लाटणं घेऊनच धावली.

  • Share this:
    मुंबई, 26 ऑगस्ट : दिर (Brother in law) लहान असो किंवा मोठा त्याच्या आवडीनिवडी वहिनी (Sister in law) जपतेच. आपल्या लाडक्या दिराची (Devar) ती आईप्रमाणे किंवा बहिणीप्रमाणे काळजी घेते. दिरही अगदी वहिनीला (Bhabhi) आई किंवा बहिणीसारखंच समजून तिच्याकडे आपल्याला हवं ते बिनधास्त मागतो. अशाच एका दिराने आपल्या वहिनीकडे (Devar Bhabhi) नको तो हट्ट केला आणि मग काय वहिनीने त्याला लाटणीनेच चोपलं. वहिनी-दिराचा (Devar Bhabhi Video) मजेशीर व्हिडीओ (Funny video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यात दिराने वहिनीकडे असं काही मागितलं की वहिनी लाटणी घेऊन दिराला मारायला त्याच्या मागे धावत गेली.

    व्हिडीओत पाहू शकता वहिनी चुलीवर स्वयंपाक करते आहे. ती चपाती करण्याच्या तयारी आहे. तिच्यासमोर चपातीचं पीठ आणि पोळपाट लाटणं आहे. इतक्या तिचा दिर गाणं म्हणत तिच्याजवळ येतो. आणि एका गाण्याच्या माध्यमातून तो आपल्या वहिनीला आपल्याला काय हवं आहे, ते सांगतो.

    हे वाचा - अरे आवर! खोडकर दिराला वहिनीने एका चापटीत आणलं ताळ्यावर; VIDEO VIRAL

    गाण्याच्या बोलानुसार दिर आपल्या वहिनीला आपल्याला लग्न करायचं असल्याचं सांगतो. वहिनी माझंही लग्न करून दे असं सांगतो. आपल्यासाठी तो तिच्या बहिणीचा हात मागतो. दिराचा हा भलताच हट्ट ऐकून वहिनीला राग येतो आणि ती लाटणं हातात घेऊन चपात्या लाटणं सोडून दिराच्याच मागे ते लाटणं घेऊन पळते आणि त्याला लाटण्याने मारते.

    हे वाचा - आरारारारा... खतरनाक! डोक्यावर पदर घेऊन जबरदस्त ठुमके; वहिनी-दिराचा भन्नाट डान्स

    वहिनी-दिरामध्ये ही मजामस्ती सुरू आहे. ज्यात वहिनी दिराला मजेत मारताना दिसते आहे. आपल्या खोडसर दिराला ते मारताना ती गोड हसतेसुद्धा. रेखा सुमित मीणा इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो नेटिझन्सच्या चांगल्याच पसंतीस पडला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

    Published by:Priya Lad
    First published: