Home /News /national /

संसद अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी; 30 टक्के खासदार पॉझिटिव्ह, शिवसेनेच्या 4 सदस्यांचा समावेश

संसद अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी; 30 टक्के खासदार पॉझिटिव्ह, शिवसेनेच्या 4 सदस्यांचा समावेश

New Delhi: Parliament House illuminated,  during the ongoing Budget Session, in New Delhi, Monday, March 23, 2020. Both Houses of the Parliament on Monday adjourned sine die, 12 days ahead of its scheduled closure aimd the novel coronavirus (Covid-19) outbreak in the country. (PTI Photo/Manvender Vashist)(PTI23-03-2020_000275B)

New Delhi: Parliament House illuminated, during the ongoing Budget Session, in New Delhi, Monday, March 23, 2020. Both Houses of the Parliament on Monday adjourned sine die, 12 days ahead of its scheduled closure aimd the novel coronavirus (Covid-19) outbreak in the country. (PTI Photo/Manvender Vashist)(PTI23-03-2020_000275B)

14 सप्टेंबरपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 1 ऑक्टोबरपर्यंत चालेल.

नवी दिल्ली 14 सप्टेंबर: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात जवळपास 30 टक्के खासदारांचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह आले असून त्यात दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. पॉझिटिव्ह सदस्यांमध्ये शिवसेनेच्या लोकसभेतील 4 खासदारांचाही समावेश आहे. तर या आधीच अनेक खासदार आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यातले अनेक जण कोरोनामुक्तही झाले आहेत. त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली. कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदलली आहे. अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अजुन मिळालेले नाही अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली आहे. संसदेचं अधिवेशन सोडून राहुल गांधी परदेशात; सरकारला घेरण्याची संधी पुन्हा गमावली संसदेत दररोज फक्त 4 तास कामकाज होणार आहे. जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही Online पद्धतीनेच दिली जाणार आहेत. 14 सप्टेंबरपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 1 ऑक्टोबरपर्यंत चालेल. या काळात, सलग 18 बैठका पार पडती, ज्यामध्ये 45 विधेयक आणि 11 अध्यादेश आणले जातील. यानंतर संसदेचं कामकाज सुरू करण्यात येईल अशी शक्यता आहे. लोकांची कामं न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही : कोर्ट संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आठवड्याच्या 7 ही दिवशी होईल. यावेळी आठवड्याची सुट्टी मिळणार नाही. दररोज 4 तास दोन्ही सत्रांचं कामकाज सुरू असेल. तर अधिवेशनाता पहिला दिवस वगळता उर्वरित राज्यसभा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पार पडणार, तर लोकसभा संध्याकाळी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत असेल अशी माहिती देण्यात आली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus, Parliment

पुढील बातम्या