नवी दिल्ली 08 एप्रिल : कोरोनाचा देशातला प्रसार वाढतोच आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत भरच पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 773 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 32 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे देशभरातल्या मृत्यू झालेल्यांची संख्या 149 झाली आहे. तर कोरोना बाधितांची संख्या 5119वर गेलीय. आत्तापर्यंत 402 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. Hydroxychloroquine या औषधाचा भविष्यात तुटवडा राहणार नाही याची काळजी सरकार घेईल असंही अग्रवाल यांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आज संवाद साधला. पंतप्रधानांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि त्यांचीही मतं ऐकून घेतली. कोरोनाला आटोक्यात आणायचं असेल तर लॉकडाऊन वाढविण्यात यावा असं मत सर्वच नेत्यांनी व्यक्त केलं. VIDEO : कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि तिच्या मुलीचे अश्रू पाहून डोळ्यात येईल पाणी पंतप्रधान 11 तारखेला सर्वच मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. त्यानंतर लॉकडाऊनबाबात निर्णय घेतला जाईल. मात्र या नेत्यांशी बोलताना लॉकडाऊन हटवावा अशी परिस्थिती सध्या दिसत नसल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत. 14 एप्रिलपर्यंत सध्याच्या लॉकडाऊनची मुदत आहे. मात्र देशात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पूर्णपणे काढला जाणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोना चाचणीसाठी लोकांकडून पैसे घेऊ नका, SCने यंत्रणा तयार करण्याचे दिले आदेश
कोरोनामुळे आता सगळीच परिस्थिती बदलणार आहे. घरात आणि सर्वाजनिक ठिकाणी वावरतानाही सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल. सगळ्याच क्षेत्रात बदल होणार आहेत. असे संकेतही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना दिलेत.
(संपादन - अजय कौटिकवार)