जाहिरात
मराठी बातम्या / देश / लॉकडाउनमध्ये सूट देणे किती फायदेशीर? धक्कादायक माहिती आली समोर

लॉकडाउनमध्ये सूट देणे किती फायदेशीर? धक्कादायक माहिती आली समोर

लॉकडाउनमध्ये सूट देणे किती फायदेशीर? धक्कादायक माहिती आली समोर

लॉकडाउनमध्ये सूट दिल्यास आणि या काळात नियम थोडे कमी केले तर विषाणूचे परिणाम बर्‍याच भागात पुन्हा गंभीर रूप धारण करू शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 जून : कोरोना व्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.  जगभरातील प्रत्येक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे  भीतीचे वातावरण आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सूचना केली जात आहे. कोरोना विषाणूशी झुंज देणारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे अनुसरण करणार्‍या जगाला पुढील दोन वर्षांसाठी म्हणजेच 2022 पर्यंत अनेक कठोर नियम पाळावे लागतील. या संदर्भात बरीच संशोधने पुढे येत आहेत. कोरोना व्हायरस विरूद्ध युद्धाचा हा पहिला टप्पा आहे.  येणाऱ्या काळात बरीच आपत्ती येऊ शकते. व्हायरसचा प्रभाव कमकुवत झाल्यामुळे लॉकडाउन काही प्रमाणात हलके झाले असले तरी थोडीशी निष्काळजीपणा कोरोना विषाणूच्या संसर्गाला पुन्हा  वाढ देऊ शकते. कोट्यवधी लोकांचा यामुळे बळी जाऊ शकते. सामाजिक अंतर म्हणजे वृद्ध, मुले आणि रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता कमी असणार्‍या लोकांसाठी सर्वात योग्य उपाय आहे. हेही वाचा- कोरोना योद्ध्यांसाठी हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, पालिकेला दिले हे आदेश लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यास आणि या  काळात नियम थोडे कमी केले तर विषाणूचे परिणाम बर्‍याच भागात पुन्हा गंभीर रूप धारण करू शकतो. यामुळे मानव समाज पुन्हा एकदा गंभीर संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे, असं नुकतेच अमेरिकेच्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे संशोधन सायन्स जर्नल या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. व्हायरस इन्फ्लुएन्झा सारख्या जगात राहील त्यामुळे अशा परिस्थितीत किमान 6 महिने  बरीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. लोकांनी  किमान 2 वर्षे लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे लागेल, असे वैज्ञानिकांना वाटत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने लॉकडाउन हा कोरोना व्हायरसला रोखण्यात  यशस्वी झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी किमान 2 आठवडे थांबायला सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे पुढे नाही आल्यास तरच लॉकडाउन नियम शिथिल केले पाहिजेत. हेही वाचा- पुणेकरांना लॉकडाउनमध्ये जप्त केली वाहनं मिळणार, पण पोलिसांची आहे ‘ही’ अट! हॉवर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे की, ‘ही लस तयार होईपर्यंत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.’ एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या मते, ’ कोरोनावर लस तयार होण्यासाठी किमान 2 वर्षे लागू शकतात. परंतु, सामाजिक अंतरांसारख्या नियमांचे पालन करून आपल्याला जीवन जगणे बंधनकारक करावे लागेल.’ हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनीही हे उघड केले आहे की, ‘कोरोना विषाणू वेळोवेळी स्वत: मध्ये बदल घडवून आणतो आहे. ही एक अतिशय धोकादायक स्थिती आहे अशा परिस्थितीत, ही लस बनवणे अधिक क्लिष्ट होत चालली आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात