पुणेकरांना लॉकडाउनमध्ये जप्त केली वाहनं मिळणार, पण पोलिसांची आहे 'ही' अट!

पुणेकरांना लॉकडाउनमध्ये जप्त केली वाहनं मिळणार, पण पोलिसांची आहे 'ही' अट!

पुण्यात लॉकडाउनदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या हजारो गाड्या पुणेकरांना आता कोर्टात न जाताही परत मिळू शकणार आहेत.

  • Share this:

पुणे, 01 जून : राज्यात लॉकडाउन 5.0 ची घोषणा करण्यात आली आहे. पाचव्या लॉकडाउनमध्ये काही अटी शिथिल करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता पुणे पोलिसांनीही लॉकडाउनच्या काळात जप्त केलेली वाहनं मालकांना परत देण्यासाठी निर्णय घेतला आहे.

पुण्यात लॉकडाउनदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या हजारो गाड्या पुणेकरांना आता कोर्टात न जाताही परत मिळू शकणार आहेत. पण त्यासाठी पुणे पोलिसांकडे प्रत्येक गाडीमागे अडीच हजारांचे सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागणार आहे. स्वत: पुणे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनीच न्यूज 18 लोकमतलाही माहिती दिली आहे.

हेही वाचा-जीवघेण्या महासाथीत अंधश्रद्धेचाही फैलाव; महिलांनी 'कोरोना देवी'ला घातलं साकडं

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन करण्यात आला होता. लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, असं आवाहन वारंवार पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात येत होतं. पण, तरीही लोकं विनाकारण रस्त्यावर बाहेर पडत होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत वाहनं जप्त केली होती.

पुण्यात लॉकडाउनचे उल्लघंन केल्या प्रकरणी गेल्या दोन महिन्यात तब्बल 47 हजार दुचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या सर्व गाड्या विविध पोलीस ठाण्यांच्या आवारात धूळ खात पडल्या होत्या.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रीवादळ, हवामान खात्याने फोटो केला प्रसिद्ध

पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी या गाड्या त्यांच्या मालकांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना कोर्टात न जाता आपले वाहन ताब्यात घेता येईल. आता पुणेकर या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 1, 2020, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading