कोरोना योद्ध्यांसाठी हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, पालिकेला दिले हे आदेश

कोरोना योद्ध्यांसाठी हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, पालिकेला दिले हे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय देत संपूर्ण विदर्भातील फ्रंट लाईन कोरोना योद्ध्यांची कोरोना चाचणी तात्काळ करण्याचे आदेश आज दिलेत.

  • Share this:

नागपूर 1 जून: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आणि इतर मेडिकल स्टाफ अतिशय जोखीम पत्करून लढत आहेत. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. मात्र याच योद्ध्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. आता नागपूर हायकोर्टाने एक मोठा आदेश दिला असून विदर्भातल्या प्रत्येक कोरोना योद्ध्याची कोव्हीड चाचणी तातडीने करण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय देत संपूर्ण विदर्भातील फ्रंट लाईन कोरोना योद्ध्यांची कोरोना चाचणी तात्काळ करण्याचे आदेश आज दिलेत. येत्या 7 दिवसाच्या आत नवीन गाईड लाईन बनवून विदर्भातील प्रत्येक फ्रंट लाईन, डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कस व इतर अश्या कोरोना योद्धांची कोरोना चाचणी करण्यात यावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी यासंदर्भात कोर्टात दाखल केलेल्या PIL वर नागपूर महापालिका प्रशासन व मनपा आयुक्त यांनी अशा चाचणीची गरज नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं.

अशा चाचणीसाठी मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणात पैसे लागतील असं त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. या सर्व बाबी उच्च न्यायालयातर्फे खारीज करण्यात आल्या प्रशासनाचा हा धक्का असल्याचं वकिल तुषार मंडलेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -

जीवघेण्या महासाथीत अंधश्रद्धेचाही फैलाव; महिलांनी 'कोरोना देवी'ला घातलं साकडं

सरकारच्या उलट आहे शास्त्रज्ञांचा दावा, कोरोनाचं होतंय कम्युनिटी ट्रान्समिशन

 

First published: June 1, 2020, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading