मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह, भररस्त्यात लोकांच्या देखत तरुणाचा भयंकर शेवट

मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह, भररस्त्यात लोकांच्या देखत तरुणाचा भयंकर शेवट

रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ले येथील मूळ रहिवासी असलेले नागराजू इस्लाम धर्म स्वीकारण्यासही तयार होते. परंतु, मुलीच्या कुटुंबीयांना हे नातंच नको होतं. सुल्ताना मूळची घणापूरची आहे.

  • Published by:  Digital Desk

हैदराबाद, 5 मे : ऑनर किलिंगच्या संशयास्पद प्रकरणात, 26 वर्षीय कार सेल्समनची त्याच्या पत्नीच्या भावाने आणि एका नातेवाईकाने गुरुवारी रात्री गजबजलेल्या रस्त्यावर हत्या केली. या व्यक्तीने हल्लेखोरांच्या बहिणीशी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याबद्दल हा खून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या पती आणि पत्नीचा धर्म वेगवेगळा होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपं स्कूटरवरून जात असताना सरूरनगरमध्ये भर रस्त्यावर हा खून करण्यात आला. विवाहित महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवलं. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या संशयितांनी मृत बिल्लीपुरम नागराजू यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले आणि आजूबाजूला अनेक लोक असताना त्यांच्या देखत नागराजू यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांनाही धमकावलं. “नागराजू यांना भोकसून ठार करण्यात आलं,” असं पोलिसांनी सांगितलं.

नागाराजू आणि सय्यद अश्रीन सुलताना हे पती-पत्नी शालेय जीवनापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी 31 जानेवारीला आर्य समाज, लाल दरवाजा इथे विवाह केला. जेव्हा या जोडप्याने लग्न करण्याचा आपला इरादा वारंवार व्यक्त केला तेव्हाही मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला.

'द हिंदू'च्या वृत्तानुसार, रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ले येथील मूळ रहिवासी असलेले नागराजू इस्लाम धर्म स्वीकारण्यासही तयार होते. परंतु, मुलीच्या कुटुंबीयांना हे नातंच नको होतं. सुल्ताना मूळची घणापूरची आहे.

हे वाचा - हिंमतच कशी झाली तुझी? 'दबंग लेडी PSI' ने स्वतःच्या होणाऱ्या पतीला केली अटक

लग्नानंतर हे जोडपं पंजाला अनिल कुमार कॉलनी इथे भाड्याच्या घरात राहू लागलं. महिलेच्या कुटुंबीयांच्या धमकीच्या भीतीने ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे काही काळासाठी गेले होते आणि नुकतेच परतले होते.

संशयित आरोपी सतत या दाम्पत्याच्या हालचालींचा माग काढत होते. अखेर त्यांनी भररस्त्यात नागराजू यांच्यावर हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे वाचा - सॅल्यूट..!स्तनपान देऊन दोन महिला कॉन्स्टेबल बनल्या अडीच महिन्यांच्या बाळाच्या आई

नागराजूची हत्या करणारे दोन जण ताब्यात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर, मृत नागराजू यांच्या पत्नीने पाच जणांनी तिच्या पतीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

First published:

Tags: Hindu, Muslim, Telangana