Home /News /national /

Exclusive | यूपीमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, लोकांचा पाठिंबा असल्याचा अमित शाह यांचा दावा

Exclusive | यूपीमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, लोकांचा पाठिंबा असल्याचा अमित शाह यांचा दावा

यूपीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) डिसेंबर 2013 पेक्षा जास्त पाठिंबा आहे आणि यूपीमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे, असं अमित शाह म्हणाले.

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्ष (BJP) उत्तर प्रदेश 2022 निवडणुकीमध्ये (Uttar Pradesh Elections 2022) पूर्ण बहुमतानं जिंकेल. राज्यातील जनतेनं कायदा आणि सुव्यवस्था, लोककल्याण, विकास आणि सुधारित प्रशासन या चार मुख्य मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिला आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे. नेटवर्क18 ग्रुपचे मुख्य संपादक राहुल जोशी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत शाह बोलत होते. मुलाखतीत अमित शहा म्हणाले की, यावेळी यूपीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) डिसेंबर 2013 पेक्षा जास्त पाठिंबा आहे आणि यूपीमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेतील 403 जागांपैकी तब्बल 172 जागांसाठी निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यात मतदान (Voting) झालं आहे. तर, उर्वरित जागांसाठी 7 मार्चपर्यंत चार टप्प्यांत मतदान होईल. 10 मार्च रोजी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित केले जातील. 'मतदानाचे तीन टप्पे झाले आहेत, पुढील टप्प्यात बाकीचं मतदान होणार आहेत. मी प्रचारादरम्यान यूपीतील प्रत्येक जिल्ह्यात जनविश्वास यात्रा (Jan Vishwas Yatra) व विजय संकल्प यात्रा (Vijay Sankalp Yatra) काढल्या होत्या. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅलीदेखील केल्या होत्या. उत्तर प्रदेशात भाजप पूर्ण बहुमतानं विजयी होईल. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकांची मनं जिंकण्यात यश आलं आहे. डिसेंबर 2013 च्या तुलनेत सध्या जनतेच्या मनात पंतप्रधानांबद्दल प्रेम आणि पाठिंब्याची भावना खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अगदी तळागाळातील लोकांच्या मनातदेखील हीच भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप बहुमतानं विजयी होईल, हे मी ठामपणे सांगू शकतो. आम्ही थेट चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब करू,' असं शाह मुलाखतीत म्हणाले. VIDEO : ...अन् पंतप्रधान मोदी स्टेजवरच कार्यकर्त्याच्या पाया पडले; जाणून घ्या खास कारण पक्षानं 2017 मध्ये 325 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही 300 प्लस जागा मिळवण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. त्याविषयी बोलताना शाह यांनी, सर्व्हे (Surveys) आणि ओपिनीयन पोल्सबाबत (Opinion Polls) सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. 'जर तुम्ही सर्वेक्षणांवर नजर टाकली तर भाजपला या निवडणुकीत 230 ते 260 जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. 2017मध्ये 238 जागा मिळतील असा अंदाज होता, प्रत्यक्षात आम्ही 325 जागा जिंकल्या. परसेप्शन (Perception) हा सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा पैलू आहे, कारण लोक त्यांची विश्वासार्हता सर्वेक्षणाशी जोडतात. पण, सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तीला जनता सर्व खरीच माहिती देते, असंही आपण म्हणू शकत नाही. यात अनेक विरोधाभास (Contradictions) आहेत, असं केंद्रीय मंत्री म्हणाले. यावेळी यूपीमधील भाजपच्या मुख्य निवडणूक मुद्द्यांबाबत विचारलं असता, लोकांनी भाजपला चार मुख्य मुद्द्यांवर पाठिंबा दिला असल्याचं शाह यांनी सांगितलं. 'आधीच्या तीन निवडणुकांपेक्षा यूपीच्या जनतेनं आम्हाला यावेळी जास्त पाठिंबा दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order), गरीब कल्याण (Gareeb Kalyan), विकास म्हणजे पिण्याचं पाणी (Drinking Water) आणि विजेची उपलब्धता (Electricity) व आम्ही उत्तर प्रदेशच्या प्रशासनात कशा प्रकारे सुधारणा केली आहे, या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेनं पाठिंबा दिला आहे,' असं शाह म्हणाले. गुजरातमधील सुधारणांपासून ते ग्लोबल पिच बनवण्यापर्यंत, दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यात मोदींची भूमिका कशी होती? अमित शाह म्हणाले की, पूर्वीच्या समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि बसपा सरकारांनी (BSP Governments) जातीच्या आधारावर काम केलं. त्यांनी केवळ घराणेशाहीचं राजकारण केलं. म्हणून, यूपीच्या लोकांनी 2014मध्ये नरेंद्र मोदींनी आणलेला बदल स्वीकारला आहे. 'जातीय मुद्दे आणि घराणेशाहीच्या आधारावर काम करणाऱ्या सपा आणि बसपा सरकारांनी जनतेचा आवाज कधीच ऐकला नाही. दोन्ही सरकारांनी फक्त आपापल्या जातीसाठी काम केलं. इतर जनता फक्त न्याय मिळण्याच्या आशेवर होती. यामुळे काही लोकांनी स्वतःहून राजीनामे दिले होते. पण, 2014मध्ये मोदीजी सत्तेत आल्यानंतर लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्णदेखील केल्या, असंही शाह म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. हा दावा कितपत खरा ठरतो हे, 10 मार्च 22 रोजी म्हणजे निकालाच्या दिवशी समजेल.
First published:

Tags: Amit Shah, BJP, UP Election, Yogi Aadityanath

पुढील बातम्या