Home /News /national /

तणावादरम्यान काश्मीरमधून सकारात्मक बातमी; हिंदू महिलेसाठी पाणावले मुस्लीम बांधवांचे डोळे, सांगितलं खास नातं

तणावादरम्यान काश्मीरमधून सकारात्मक बातमी; हिंदू महिलेसाठी पाणावले मुस्लीम बांधवांचे डोळे, सांगितलं खास नातं

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील यार खुशीपोरा येथील ग्रामस्थांनी दुलारी भट या 80 वर्षीय हिंदू महिलेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. शेजाच्याच एका गावातील नातेवाईकाच्या लग्नसमारंभात सहभागी झाली असतानाच महिलेचं निधन झालेलं.

पुढे वाचा ...
    श्रीनगर 15 मे : नुकत्याच झालेल्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे दुःख आणि निराशेच्या काळात आता एक सकारात्मक घटना समोर आलेली आहे. यात 80 वर्षीय महिलेला अखेरचा निरोप देण्यासाठी मुस्लीम आणि हिंदू एकत्र आल्याचं चित्र काश्मीरच्या खोऱ्यात पाहायला मिळालं (Hindus and Muslims Together Cremated Woman In Kulgam). चडूरा येथील तहसील कार्यालयात गुरुवारी अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने राहुल भट या लिपिकाचा मृत्यू झाला. या निर्घृण हत्येनंतर तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबाला जबाबदार धरलं होतं आणि दावा केला होता की बांदीपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. गेल्या 11 वर्षांपासून घाटीत महसूल विभागात कार्यरत असलेल्या 36 वर्षीय कर्मचाऱ्याचा दुःखद अंत झाल्याने देशभरात तणाव पसरला. VIP लोकांवर हल्ला करण्याचा आखत होता कट, सुरक्षा दलानं आवळल्या LeT दहशतवाद्याच्या मुसक्या या घृणास्पद घटनेच्या अवघ्या दोन दिवसांनंतर शनिवारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील यार खुशीपोरा येथील ग्रामस्थांनी दुलारी भट या 80 वर्षीय हिंदू महिलेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. शेजाच्याच एका गावातील नातेवाईकाच्या लग्नसमारंभात सहभागी झाली असतानाच महिलेचं निधन झालेलं. शनिवारी पहाटे तिला वाय के पोरा येथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलं. तिथे फार कमी हिंदू कुटुंबं असल्याने गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी महिलेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचं काम स्थानिक मुस्लीम तरुणांना सोपवलं होतं. या तरुणांनीही लगेचच संपूर्ण व्यवस्था केली. त्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाचे तुकडे आणले, स्मशानभूमीत मृतदेह घेऊन जाण्यासाठी एक उघडा ताबूत बनवला, फुलाच्या पाकळ्या आणि उदबत्त्या आणल्या आणि मृतदेह अंत्यसंस्काराच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व कामं केली. अल्पसंख्याक मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात, वेगवान कारची ट्रकला धडक दुलारी या मट्टन अनंतनाग येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी वाई के पोरा येथे नेण्यात आलं, जिथे महिलेचे शेजारी असलेले मुस्लीम बांधव मृतदेहाची वाट पाहत होते. महिलेच्या घराजवळ काही महिला उभ्या होत्या, ज्यांच्या डोळ्यात पाणी होतं. “आम्ही गेली 50 वर्षे एकत्र राहतो आणि एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी एकमेकींच्या पाठीशी उभा होतो,” असं दुलारी यांचे शेजारी साजा यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की “आमचं कुटुंब या घटनेनं दुःखात होतं पण त्यांनी अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था केली. समुदायानी असंच जगलं पाहिजे”
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Proud hindustani muslim

    पुढील बातम्या