Home /News /national /

अल्पसंख्याक मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात, वेगवान कारची ट्रकला धडक

अल्पसंख्याक मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात, वेगवान कारची ट्रकला धडक

अल्पसंख्याक मंत्र्याच्या (Minority Minister) कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

    राजस्थान, 14 मे: अल्पसंख्याक मंत्र्याच्या (Minority Minister) कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. राजस्थान (Rajasthan) सरकारचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री सालेह मोहम्मद (Minority Affairs Minister Saleh Mohammad) शनिवारी सकाळी एका रस्ता अपघातात थोडक्यात बचावले. या अपघातात त्यांचा गनमॅन आणि चालक किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर मंत्री सालेह मोहम्मद आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या वाहनाने पोखरणला (Pokhran) रवाना करण्यात आलं. राजीव गांधी थाना पोलीस स्टेशनचे अधिकारी अनिल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरूपासून सुमारे 2 किमी पुढे गेल्यावर एका वळणावर मंत्री सालेह मोहम्मद यांची कार ओव्हरटेक करताना एलपीजी गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकली. यामुळे सरकारी गाडीचा काही भाग पूर्णपणे खराब झाला. कारमध्ये बसलेल्या गनमॅन व्यक्तीच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून वाहनावर नियंत्रण ठेवताना चालकालाही काही दुखापत झाली आहे. Delhi Mundka Fire: 'त्या' एका WhatsApp मेसेजनं वाचवले 100 लोकांचे प्राण,नाहीतर... मंत्री सालेह मोहम्मद हे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गनमॅन आणि चालकावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मंत्र्याला दुसऱ्या गाडीने जैसलमेरला पाठवण्यात आलं. या अपघाताबाबत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Accident, Car, Rajasthan

    पुढील बातम्या