मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIP लोकांवर हल्ला करण्याचा आखत होता कट, सुरक्षा दलानं आवळल्या LeT दहशतवाद्याच्या मुसक्या

VIP लोकांवर हल्ला करण्याचा आखत होता कट, सुरक्षा दलानं आवळल्या LeT दहशतवाद्याच्या मुसक्या

terror attack

terror attack

भारतीय लष्करानं (Indian Army) लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar e Taiba)एका दहशतवाद्याला (Terrorist)अटक केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

श्रीनगर, 14 मे: भारतीय लष्करानं (Indian Army) लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar e Taiba)एका दहशतवाद्याला (Terrorist)अटक केली आहे. हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील रफियाबाद आणि सोपोर (Rafiabad and Sopore) भागात सुरक्षा दल आणि व्हीआयपी यांना लक्ष्य करण्याचा कट रचत होता. रिजवान शफी लोन असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो हंदवाडा येथील रहिवासी आहे. (Jammu Kashmir Terrorist Arrest)

विशिष्ट माहितीवर कारवाई करत रफियााबाद आर्मीने रफियाबाद पोलिसांसह रोहामा येथे संयुक्त कारवाई सुरू केली आणि एका दहशतवाद्याला पकडले, असे भारतीय लष्कराच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. त्याच्याकडून पिस्तूलसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

अल्पसंख्याक मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात, वेगवान कारची ट्रकला धडक

लष्कराच्या वतीनं असे सांगण्यात आलं की, हा दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता आणि रफियाबाद आणि सोपोर भागात सुरक्षा दल आणि व्हीआयपी यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याची योजना आखत होता. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या खोऱ्यात दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दल सतत शोध मोहीम राबवत असून त्यांना सातत्याने यशही मिळत आहे. 11 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यादरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केलं. मात्र यादरम्यान दोन दहशतवादी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक AK-47 रायफल, 3 मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत.

First published:

Tags: Jammu and kashmir, Srinagar, Terrorist attack