शिमला 08 डिसेंबर : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत दिसून येत आहे. वृत्त लिहिपर्यंत समोर आलेल्या आकड्यांनुसार, काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 29 जागांवर आघाडीवर आहे, तर अपक्ष उमेदवार 3 जागांवर आघाडीवर आहेत.
हिमाचल प्रदेशच्या 68 सदस्यीय विधानसभेत बहुमताचा आकडा 35 आहे. अशा स्थितीत बहुमताचा जादुई आकडा अडकला तर सरकार स्थापनेत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरते. यात अपक्ष उमेदवारांपैकी, नालागढमधून केएल ठाकूर आणि डेरामधून होशियार सिंह आघाडीवर आहेत, भाजपला त्यांच्याकडून आशा आहेत. हे दोघेही भाजपचे जुने कार्यकर्ते असून, पक्षापासून फारकत घेऊन त्यांनी निवडणूक लढवली आहे. गरज पडल्यास हे दोघेही भाजपला बहुमतापर्यंत नेण्यास मदत करू शकतात, असं मानलं जात आहे.
केएल ठाकूर यांनी आधी सांगितलं होतं की भाजप आणि काँग्रेस दोघांनीही त्यांच्याशी संपर्क साधला आहे, परंतु अधिकृतपणे निकाल जाहीर झाल्यानंतर ते त्यांचा निर्णय सांगतील. त्याचवेळी, दुसरे अपक्ष उमेदवार राम सिंह म्हणाले की, पूर्ण निकाल आल्यानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा हे मी ठरवेल.
Gujarat Election Results 2022 : जडेजाची पत्नी आऊट का नॉटआऊट? जामनगरचे शॉकिंग आकडे
याआधीही हिमाचल प्रदेशमधील अनेक निवडणुकांमध्ये अपक्ष आमदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे विशेष. 1982 मध्ये काँग्रेसने 68 सदस्यीय विधानसभेत 31 जागा जिंकून अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. त्या निवडणुकीत भाजप आणि जनता दलाने अनुक्रमे 29 आणि 2 जागा जिंकल्या आणि अपक्षांना सहा जागा मिळाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Himachal pradesh, Rahul gandhi