मुंबई 08 डिसेंबर : हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यांतील कल समोर येऊ लागले आहेत. यात एक्झिट पोलनुसारच गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर, हिमाचलमध्ये सकाळी सुरुवातील काँग्रेस आघाडीवर होतं. आता भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. या निकालावर आता संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी दोन्ही राज्यातील निवडणुकीच्या कलाबाबत बोलत राहुल गांधी यांची बाजू लावून धरली आहे. हिमाचलमधील आघाडीसाठी त्यांनी राहुल गांधींचं कौतुकही केलं आहे. संजय राऊत म्हणाले, की गुजरातचा निकाल अपेक्षितच आहे. तिकडे आप आणि इतर पक्षांनी आघाडी केली असती तर नक्कीच काँटे की टक्कर झाली असती. पण बहुधा दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा, असं साटंलोटं झालं असावं अशी लोकांना शंका आहे, असं संजय राऊत म्हणाले.
Election Result: मोदींना मोठा धक्का; गुजरात नव्हे तर 'या' राज्यात काँग्रेसचा डंका, धक्कादायक निकाल
भाजपवर निशाणा साधत राऊत म्हणाले, की दिल्ली हातातून गेलंय आणि हिमाचलमध्येही यांना संघर्ष करावा लागतोय. हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकेल. हिमाचलमध्ये काँग्रेस ज्यापद्धतीने लढत आहे यासाठी काँग्रेसचं अभिनंदन. देशातील पुढील निवडणुकांसाठी हे चित्र आशादायक आहे. विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हेवेदावे, अहंकार बाजूला ठेवून एकत्र लढाई केली तर देशामध्ये आणि गुजरातमध्येही परिवर्तन होईल. जर सगळे एकत्र येऊन लढले तर 2024 मध्ये चित्र वेगळं असेल, असं ते म्हणाले.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले, की राहुल गांधीच्या यात्रेचा निवडणुकांशी संबंध जोडू नका. ते वेगळ्या मिशनवर आहेत. ते दोन महिन्यांपासून राजकारणापासून दूर आहेत. ते वेगळ्या मिशनला पुढे नेत आहेत..देश जोडणं, लोकांची मनं जोडणं, संघर्ष थांबवणं हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या यात्रेचा काही या निवडणुकांशी संबंध नाही. याची जबाबदारी इतर लोकांवर होती, असंही राऊत म्हणाले.
Gujarat Election Results 2022 : जडेजाची पत्नी आऊट का नॉटआऊट? जामनगरचे शॉकिंग आकडे
पुढे भाजप नेत्यांवर टीका करत ते म्हणाले, की भाजप नेत्यांनी माफी मागावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल आम्ही तुम्हाला जाब विचारला.तर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार का? आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. सीमावाद अचानक उफाळून आला नाही, तो उकरुन काढण्यात आला.भाजपची फूस आहे, असा आरोप करत तुम्ही काय अॅक्शन घेतली? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi, Sanjay raut