• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुमचा हात चेहऱ्याजवळ जाताच वाजणार अलार्म; NASA चं उपकरण कोरोनाला दूर ठेवण्यात मदत करणार

तुमचा हात चेहऱ्याजवळ जाताच वाजणार अलार्म; NASA चं उपकरण कोरोनाला दूर ठेवण्यात मदत करणार

नासाने (NASA) पल्स  (PULSE) हे उपकरण तयार केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 03 जुलै : भारतात तयार करण्यात आलेली कोरोनाव्हायरसची लस (coronavirus vaccine) 15 ऑगस्टपर्यंत येणार. मात्र तोपर्यंत कोरोनाव्हायरसपासून बचावाची आपणच आपली काळजी घ्यायला हवी. मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि हात स्वच्छ धुणं हे सर्व करणं गरजेचं आहे. आता तर या सवयी आपल्या दैनंदिन आयुष्याचा भागच झाला आहे.  कोरोनाला दूर ठेवण्यासाठी या सवयींचा आपण अवलंब करत असताना आपली एक सवय सोडणंदेखील गरजेचं आहे आणि ते म्हणजे वारंवार आपल्या चेहऱ्याला हात लावणं. किती काही झालं तरी आपली ही सवय काही सुटता सुटत नाही. उलट आपण आपल्या चेहऱ्याला किती तरी वेळा हात लावतो आणि ते आपल्यालाच कळत नाही. आपल्या नकळतच आपला हात चेहऱ्याजवळच जातो. त्यामुळे ही सवय तशी लवकर सुटणं शक्यही नाही. मात्र नासाने आता यावर मार्ग शोधून काढला आहे. नासाने एक असं उपकरण तयार केलं आहे, जे तुमचा हात तुमच्या चेहऱ्याजवळ येऊच देणार नाही. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार नासाने पल्स Pulse हे उपकरण तयार केलं आहे. हे उपकरण घातल्यानंतर जेव्हा तुनचा हात तुमच्या चेहऱ्याजवळ जाईल तेव्हा हे उपकरण वाजेल आणि तुम्हाला अलर्ट करेल. हे वाचा - कोरोना वॅक्सीनमध्ये भारताला मोठं यश! 15 ऑगस्टपर्यंत येणार COVID-19ची लस भारतात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या तेजीनं वाढत आहे. आज पहिल्यांदा देशात तब्बल नवीन कोरोना रुग्णांचा आकडा हा 21 हजारांच्या घरात गेला. गेल्या 24 तासांत तब्बल 20 हजार 903 रुग्ण सापडले. तर, गेल्या 24 तासांत 379 लोकांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 6 लाख 25 हजार 544 झाला आहे. देशात सध्या 2 लाख 27 हजार 437 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 18 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3 लाख 79 हजार 891 रुग्ण निरोगीही झाले आहेत. हे वाचा - भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत . गेल्या 24 तासांत राज्यात 6330 नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर दिल्लीत 2373. तामिळनाडुमध्ये 4343, उत्तर प्रदेश 817, पश्चिम बंगाल 649, राजस्थान 350 आणि पंजाबमध्ये 120 रुग्ण सापडले. ही आकडेवारी चिंता वाढवणारी असली तरी, भारतात निरोगी रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे. भारताचा रिकव्हरी रेट 60% झाला आहे. संपादन - प्रिया लाड
  First published: