Lockdown 4.0 : आता रेड झोनमध्ये करता येणार ऑनलाईन शॉपिंग, होणार 'या' सामानाची डिलिव्हरी

Lockdown 4.0 : आता रेड झोनमध्ये करता येणार ऑनलाईन शॉपिंग, होणार 'या' सामानाची डिलिव्हरी

गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) वतीनं चौथ्या टप्प्यासाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व भागांमध्ये काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : कोरोनाला रोखण्यासाठी देशात चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 31 मेपर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला असून, यामध्ये विशेष सूटही देण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) वतीनं चौथ्या टप्प्यासाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व भागांमध्ये काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.

18 मेपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन- 4मध्ये ई-कॉमर्सला अधिक दिलासा मिळाला आहे. गृह मंत्रालयाने रेड झोनमध्ये अनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यास परवानगी दिली आहे. आता रेड झोनमध्ये असूनही, आपण Amazon, Flipkart आणि स्नॅपडील सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून टीव्ही, फ्रिज आणि एसी सारख्या वस्तू ऑर्डर करू शकता. तीनही झोनमध्ये लॉकडाउन -3 मध्ये मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.

वाचा-आजपासून Lockdown 4.0ला सुरुवात, हे होणारे बदल लक्षात ठेवा!

लॉकडाउन -4 मध्ये ई-कॉमर्सला ग्रीन, ऑरेंज आणि रेड या तिन्ही झोनमध्ये आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तू अनिवार्य आणि अनावश्यक भागात विक्री करण्याची परवानगी दिली गेली नाही.

वाचा-जगातल्या या देशांमध्ये कोरोनाचा दुसरा उद्रेक होणार, शास्त्रज्ञांचा इशारा

दोन महिन्यांनंतर होणार सामानाची विक्री

25 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. लॉकडाऊनमुळे अनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. आता सुमारे दोन महिन्यांनंतर सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक वस्तूंच्या वितरणाची परवानगी दिली आहे. 4 मेपासून ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विना-आवश्यक वस्तू वितरीत करण्याची परवानगी देण्यात आली.

या सेवा राहणार बंद

लॉकडाऊन 4 मधील मॉल, सिनेमा हॉल आणि जिम बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. रेस्टॉरंटमधून फक्त होम डिलिव्हरी होईल. तसंच, सलूनची दुकानं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा. राज्य सरकार मिठाई किंवा इतर दुकानं यासारख्या अन्य व्यावसायिक उघडण्याच्या निर्णयावर निर्णय घेतील. कोणत्याही कंटेनमेंट झोनमध्ये याची अनुमती नाही. केंद्र सरकारने 31 मेपर्यंत संपूर्ण देशात मेट्रो, ट्रेन सेवा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली मेट्रोकडून नव्या नियमांसह मेट्रो ऑपरेशनची तयारी सुरू असली तरी केंद्राची मान्यता मिळाली नाही तर त्याचे कामकाजही ठप्प होईल.

वाचा-आजपासून तुमच्या शहरात काय उघडणार आणि काय राहणार बंद, वाचा लॉकडाउन 4.0

First published: May 18, 2020, 9:26 AM IST

ताज्या बातम्या