नवी दिल्ली, 18 मे : मे अखेरपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली असली तरीही कोरोना विषाणूची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. तर मृतांचा आकडाही वाढला आहे. गेल्या 24 तासामध्ये तब्बल 157 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 हजारांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या 96169 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा 3029 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 5242 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. सध्या देशात 56 हजार 316 सक्रिय प्रकरणं आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा सर्वाधिक आहे. इथल्या रूग्णांची संख्या 33 हजारांच्या पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही 1198 वर पोचली आहे. त्याचबरोबर गुजरातमधील कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार 379 पर्यंत पोहोचला आहे, तर मृत्यू झालेल्यांची संख्या 659 आहे.
Highest ever spike of 5242 #COVID19 cases in last 24 hrs, 157 death reported in last 24 hrs. Total number of positive cases in India is now at 96169, including 56316 active cases, 36824 cured/discharged/migrated cases, death toll 3029 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/DMrKuywKLd
— ANI (@ANI) May 18, 2020
बापरे! वाऱ्यामुळे रस्त्यावर पार्क केलेली बस मागे-मागे सरकली, तुम्हीच पाहा VIDEO तामिळनाडूमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत इथे 11 हजार 224 घटनांची पुष्टी झाली असून त्यामध्ये 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. मंत्रालयाच्या अद्ययावत माहितीनुसार, दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या 10 हजार 54 आहे, ज्यामध्ये 160 लोक मरण पावले आहेत. त्याचवेळी राजस्थानमध्ये 5 हजार 202 पुष्टी झाल्याची घटना समोर आली असून त्यामध्ये 131 लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत 4977 रुग्ण आढळले आहेत, ज्यात 248 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. आता इथल्या रूग्णांची संख्या 4259 पर्यंत वाढली आहे, ज्यामध्ये 238 लोकांचा बळी गेला आहे. आजपासून तुमच्या शहरात काय उघडणार आणि काय राहणार बंद, वाचा लॉकडाउन 4.0 संपादन - रेणुका धायबर