Home /News /national /

'हे राजकारण नाही तर दुसरं काय?' जागोजागची पोस्टर्स पाहून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर अयोध्येच्या महंतांचा आक्षेप

'हे राजकारण नाही तर दुसरं काय?' जागोजागची पोस्टर्स पाहून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर अयोध्येच्या महंतांचा आक्षेप

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात लखनऊ विमानतळावर त्यांच्या आगमनाने होणार आहे.

    सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 15 जून : शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर (Aaditya Thackeray on Ayodhya Visit) आहेत. त्यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या या दौऱ्यावर हनुमानगढ़ीचे महंत राजू दास (Hanuman Gadhi Mahant Raju Das) आक्षेप घेतला आहे. काय म्हणाले, हनुमानगढ़ीचे महंत राजू दास? हनुमानगढ़ीचे महंत राजू दास मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत म्हणाले की, 'शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणतात, हा राजकीय दौरा नाही. पण मग अयोध्येच्या रस्त्यांवर आदित्य ठाकरेंची पोस्टर लागली आहेत. घोषणाबाजी सुरू आहे, त्याचं काय? मग ठाकरेंना आमच्या हिंदुत्वाच्या भूमिकेविषयीच्या प्रश्नाचंही उत्तर द्यावं लागेल', अशी भूमिका हनुमानगढ़ीचे महंत राजू दास यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात लखनऊ विमानतळावर त्यांच्या आगमनाने होणार आहे. लखनऊ विमानतळावर आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक उपस्थित रहाणार आहेत. लखनऊ विमानतळावरून आदित्य ठाकरे कारने अयोध्येकडे निघतील. वाटेत इस्काँन मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. हेही वाचा - Presidential Election 2022: राष्ट्रपती हवा असेल तर पवारांसारख्या नेत्यांचा विचार करावा लागेल - संजय राऊत त्यानंतर पंचशिल हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन हनुमान गढीला दर्शनासाठी जाणार आहेत. राम भक्त हनुमानाचे दर्शन झाल्यावर आदित्य ठाकरे प्रभू श्री राम जन्म भूमीवर रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर लक्ष्मण किला आणि सर्वात शेवटी शरयू नदीवरील नया घाटावर महाआरती आदित्य ठाकरे करणार आहेत. शरयू नदीवरील महाआरतीसाठी शिवसेनेने मोठी तयारी केल्याचे दिसून येत आहे. अयोध्या दौरा संपल्यावर रात्री उशीरा आदित्य ठाकरे मुंबईकडे रवाना होतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Ayodhya, Shivsena

    पुढील बातम्या