वर्षाला 330 रुपये भरून मिळेल 2 लाखाचा फायदा, वाचा काय आहे पोस्ट ऑफिसची योजना

वर्षाला 330 रुपये भरून मिळेल 2 लाखाचा फायदा, वाचा काय आहे पोस्ट ऑफिसची योजना

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्शूरन्स कंपनी लिमिटेडबरोबर हातमिळवणी करून त्यांच्या ग्राहकांसाठी पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजना (PMJJBY)सुरू केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्शूरन्स कंपनी लिमिटेडबरोबर हातमिळवणी करून त्यांच्या ग्राहकांसाठी पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजनेची (PMJJBY)सुरुवात केली आहे. ही योजना एक टर्म इन्शूरन्स प्लॅन आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतील. गरिबांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला विमा कव्हर मिळावा हे यामागचे ध्येय आहे.

ही योजना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या मेडिकलची आवश्यकता नाही आहे. PMJJBY (Pradhan Mantri Jeevan Jyoti Yojana) अंतर्गत टर्म प्लॅन घेण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 50 वर्षे आहे. वयाच्या 55 व्या वर्षी ही पॉलिसी मॅच्यूअर होते.

द्यावे लागतील केवळ  330 रुपये

पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजनेतील टर्म प्लॅन दरवर्षी रिन्यू करावा लागतो. यामध्ये अश्योर्ड अमाउंट अर्थात विम्याची रक्कम 2,00,000 रुपये आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक 330 रुपयाचा प्रीमियम द्यावा लागतो. याचा अर्थ असा की सामान्यांना दिवसाला एका रुपयापेक्षाही कमी रक्कम भरून 2 लाखाचा कव्हर मिळतो आहे.

1 सप्टेंबर 2018 मध्ये सुरू झाली योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आयपीपीबी लाँच केले होते. दूर्गम भागात राहणाऱ्यांना देऱीलल बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी हा यामागचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत 1.55 लाख पोस्ट ऑफिस (ग्रामीण भागात 1.35 लाख) आणि 3 लाख डाक कर्मचाऱ्यांच्या डाक नेटवर्कचा वापर केला जाईल.

टर्म प्लॅन म्हणजे काय?

विमा कंपनीची मुदत योजना किंवा टर्म प्लॅन (Term Plan) म्हणजे जोखीमपासून संरक्षण. टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर विमा कंपनी नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण विमा रक्कम देते. पॉलिसी मुदती दरम्यान पॉलिसीधारकाच्या मृत्यू झाल्यास नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते. पॉलिसी घेणारी व्यक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर ठीक असेल तर त्याला फायदा मिळत नाही. मात्र मुदतीच्या योजना हा अत्यंत नाममात्र प्रीमियमवर जोखीम संरक्षण प्रदान करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

(हे वाचा-महाराष्ट्रात 'एंट्री' करण्यासाठी आजपासून नवे नियम लागू,पाहा दादर स्टेशनचे PHOTOS)

या पॉलिसीबाबत अधिक माहितीसाठी, 1800 180 1111 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा योजनेशी संबंधित सर्व तपशील वाचण्यासाठी www.financialservices.gov.in या वेबसाइटवर सर्व माहिती मिळवू शकता. दरम्यान पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे फॉर्म विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती, बांगला, कन्नड, ओडिया, मराठी, तेलगू आणि तमिळ यांचा समावेश आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा - http://jansuraksha.gov.in/

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 25, 2020, 11:38 AM IST

ताज्या बातम्या