मराठी बातम्या /बातम्या /देश /Gujrat local body election 2021: भाजपचा पुन्हा एकदा डंका; 'आप'ला ग्रामीण लॉटरी तर काँग्रेस मात्र पिछाडीवर

Gujrat local body election 2021: भाजपचा पुन्हा एकदा डंका; 'आप'ला ग्रामीण लॉटरी तर काँग्रेस मात्र पिछाडीवर

Gujrat local body election 2021 :गुजरातच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांचे निकाल हाती येत आहेत. भाजपला जोरदार यश मिळतं आहे.

Gujrat local body election 2021 :गुजरातच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांचे निकाल हाती येत आहेत. भाजपला जोरदार यश मिळतं आहे.

Gujrat local body election 2021 :गुजरातच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांचे निकाल हाती येत आहेत. भाजपला जोरदार यश मिळतं आहे.

अहमदाबाद, 2 मार्च : गुजरात नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुक - 2021 मध्ये भाजपाला मोठाच लोकाधार आणि पाठिंबा मिळाला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांमध्ये भाजपनं 8474 जागांपैकी 4433 जागांवर विजय मिळवला आहे. (Gujrat local body election 2021)

या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त नुकसान काँग्रेसचं झालं आहे. काँगेसला आतापर्यंत केवळ 1078 जागांवर विजय मिळाला आहे. आणि 141 जागांवर ती पुढं आहे. गुजरातच्या शहरी भागांनंतर आता ग्रामीण भागांमध्येही आम आदमी पार्टी आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाली आहे. विशेषकरून पाटीदार समाज जास्त असणाऱ्या सौराष्ट्र, सूरत आणि साबरकांठामध्ये हे घडलं आहे. (Gujrat elections 2021)

AAP ची गावांमध्येही एंट्री (AAP gets huge response in rural area)

सूरत महापालिका निवडणुकांमध्ये 27 जागा जिंकून गुजरातमध्ये एंट्री करणारा आम आदमी पक्ष आता जिल्हा परिषद, तालुका आणि नगरपालिकेतही प्रवेश करता झाला आहे. सौराष्ट्र, सूरत आणि साबरकांठामध्ये पार्टीनं खूप चांगली कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेत 6, तहसील पंचायतीत 18, नगरपालिकेत 22 अशा एकूण 46 जागा जिंकल्या आहेत.

पाटीदारांच्या गडामध्येही भाजप आघाडीवर (BJP proves metal in Patidar dominated area)

मागच्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी भाजप मोठ्या विजयाकडे जात आहे. भाजपनं पाटीदार भाजपचा गड उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रातही आघाडी घेतली आहे. तर मागच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेच्या 31 पैकी 22 जागा जिंकणारी काँग्रेस अजून खातंही उघडू शकली नाही.

हेही  वाचा मोदी-शाहांच मॅजिक चालणार की दीदी पुन्हा गड राखणार? हे आहेत Opinion Poll चे आकडे

जिल्हा परिषदेत भाजप धडाकेबाज यशाकडे (BJP gets strong lead)

जिल्हा परिषदेच्या 980 पैकी 539 जागांवरचे निकाल हाती आले आहेत. 435 जागांवर भाजपचा विजय झाला असून 68 जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँगेसला 98 जागांवर विजय मिळाला असून 14 जागांवर काँग्रेस पुढं आहे. नगरपालिका, तालुका पंचायत निवडणुकांमध्येही भाजपनं चांगली आघाडी टिकवली आहे. मेहसाणा, कच्छसोबत 10 जिल्ह्यात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

काँग्रेसच्या दिग्ग्जची अवस्था वाईट( congress loses most seats)

अर्जून मोढवाडिया यांचे भाऊ नागरी निवडणुकांमध्ये वाईट पद्धतीनं पराभूत झाले. गुजरात काँगेसचे आमदार निरंजन पटेल आपल्याच निवडणूक क्षेत्रात हारले. निरंजन पटेल यांचा मुलगाही पराभूत झाला. खेदब्रम्हा इथले काँग्रेसचे आमदार अश्विन कोटवाल यांचा मुलगा हारला. तारापूरचे काँग्रेस आमदार पूनम परमारचा मुलगा विजयसुद्धा हारला. काँग्रेसचे आमदार विक्रम माडमचा मुलगा करण माडम हासुद्धा द्वारका जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झाला. (congress big shot leaders lose)

हेही वाचा दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना ताकद, भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिली मोठी जबाबदारी

नगरपालिकेच्या 8473 जागा, जिल्हा परिषदेच्या 980 जागा आणि तहसील पंचायतच्या 4773 जागांसाठी एकूण 36,008 जागांवर मतदान झालं. राज्य निवडणूक आयोगानुसार, गुजरातच्या 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 231 तहसील पंचायतींच्या निवडणुकीत जवळपास 64% मतदान झालं. आकड्यांनुसार, 81 नगरपालिकांमध्ये 58.82 टक्के, 31 जिल्हा परिषदांमध्ये 65.80% आणि 231 तहसील पंचायतींमध्ये 66.60% मतदान नोंदवलं गेलं.

First published:

Tags: AAP, BJP, Election, Gujrat