Home /News /national /

दाऊद इब्राहिमचा पंटर भारतात येताच मुसक्या आवळल्या, 24 वर्षांपासून होता फरार

दाऊद इब्राहिमचा पंटर भारतात येताच मुसक्या आवळल्या, 24 वर्षांपासून होता फरार

धक्कादायक म्हणजे जप्त करण्यात आलेले पिस्टूल आणि बुलेट्स हे पाकिस्तानी बनावटीचे होते.

    अहमदाबाद, 27 डिसेंबर: गुजरात पोलिसांच्या (Gujarat Police) दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) मोठी कामगिरी केली आहे. ATSने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Underworld don Dawood Ibrahim) पंटर माजीद कुट्टी (Majid Kutty) याच्या मुसक्या आवळल्या आहेत.  माजीद कुट्टी हा गेल्या 24 वर्षांपासून फरार होता. माजीद भारतात येताच ATS ने सापळा रचून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. माजीद हा दाऊद इब्राहिमचा खास समजला जातो. गुजरात एटीएसने आधी दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जाणारा बाबू सोलंकी याला अटक केली होती. हेही वाचा... वर्षातील शेवटच्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं 'हे' आवाहन मिळालेली माहिती अशी की, 23 फेब्रुवारी 1996 रोजी मेहसाणा येथील दूधसागर डेअरीजवळील बॉम्बे गेस्ट हाऊसवर करण्यात आलेल्या छापेमारीत आरडीएक्स (RDX) आणि मोठा शस्त्रसाठा सापडला होता. या छापेमारीनंतर माजीद फरार झाला होता. या छापेमारीत 4 किलो RDX, 115 पिस्टूल, 750 हून जास्त कार्ट्रिज, 10 डेटोनेटर जप्त करण्या आले होते. धक्कादायक म्हणजे जप्त करण्यात आलेले पिस्टूल आणि बुलेट्स हे पाकिस्तानी बनावटीचे होते. शस्त्रसाठी राजस्थानच्या बाडमेर आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आला होता. मुंबई आणि अहमदाबादेत हा शस्त्रसाठा पाठवला जाणार होता. मात्र, त्याआधीच ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर माजीद कुट्टी मलेशियाला पळून गेला होता. तो गेल्या 24 वर्षांपासून मलेशियातच होता. मात्र, माजीद पुन्हा भारतात येत असल्याची गोपनिय माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला केली. हेही वाचा..जपानमधील हा कैदी ठरला सर्वाधिक काळ फाशीची वाट पाहणारा माणूस दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गुजरात एटीएसनं दाऊदचा खास पंटर बाबू सोलंकी याला अटक केली होती. सोलंकी हा देखील गेल्या 14 वर्षांपासून फरार होता. त्याला दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जात होता. एटीएसच्या सूत्रांनुसार बाबू सोलंकी 2006 च्या एका गँगवॉरच्या केसमधील मोस्ट वॉन्टेड आहे. सध्या तो शरीफ खानच्या सांगण्यावरून काम करत होता. तोही दाऊद इब्राहिमता खास आहे. शरीफ खान हा देखील पाकिस्तान लपून बसला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: ATS, Dawood ibrahim

    पुढील बातम्या