PM Modi Mann ki Baat : वर्षातील शेवटच्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं 'हे' आवाहन

PM Modi Mann ki Baat : वर्षातील शेवटच्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं 'हे' आवाहन

नव्या वर्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे. हे कोणते 4 संकल्प आहेत वाचा सविस्तर

  • Share this:

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी दर रविवारी मन की बातमधून जनतेशी संवाद साधत असतात. शेतकरी आंदोलन, स्वच्छ भारत अभियान, कोरोना ते लोकल फॉर वोकल अशा अनेक विषयांवर पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला आहे. तर मोदींनी जनतेला वर्षा अखेरीस महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. हे मन की बात 2020मधील शेवटचं मन की बात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात संबोधित करताना सांगितले की, चार दिवसानंतर नवीन वर्षाची सुरू होणार आहे. पुढील वर्षात वेगळ्या गोष्टींवर मन की बात असणार आहे. नव्या वर्षात नव्या ऊर्जेनं कामाला लागयाचं आहे. देशात तयार झालेल्या खेळण्यांची आणि वस्तुंची मागणी वाढली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील काही प्रेरणा देणाऱ्या तरुणांचा उल्लेख केला. कर्नाटकातील एका महिलेनं श्वानासाठी खास व्हिलचेअर तयार केली होती. तर एका जोडप्यानं लग्नानंतर फिरायला जाण्याऐवजी बिच स्वच्छ करण्याचा संकल्प केला त्याबद्दल देखील मोदींनी कौतुक केलं आहे.

याशिवाय येणाऱ्या नव्या वर्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर, प्लॅस्टिकमुक्त भारत, लोकल फॉर वोकल, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझऱ हे संकल्प सर्वांनी करूया असं आवाहन देखील केलं आहे.

हे वाचा-छकुल्याला वाचवण्यासाठी बाबाची धडपड! 15 हजार पगार, पण 3 वर्षांत जमवले 1 कोटी रु.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- पीएम मोदी म्हणाले की झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्टसह काम करण्याची वेळ आता आली आहे.

-कोरोनातून आपल्याला नवीन गोष्टी देखील शिकायला मिळाल्या.

- अनेक आव्हानं आणि समस्या निर्माण झाल्या मात्र एक आशेचा किरण आहे.

- लोकल फॉर वोकल आणि आत्मनिर्भर भारत करण्यासाठी देशातील स्थानिक उत्पादनांना चालना देणं गरजेचं आहे त्यामुळे हे उत्पादन वाढवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.

- स्टार्ट अपसाठी प्रोत्साहन आणि स्थानिक वस्तुंना बाजारपेठा मिळाव्या यासाठी प्रयत्नशील

- 2014 ते 2018 बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांनी वाढली आहे. मध्य प्रदेशात ही संख्या जास्त वाढली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 27, 2020, 11:50 AM IST

ताज्या बातम्या