मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जपानमधील हा कैदी ठरला सर्वाधिक काळ फाशीची वाट पाहणारा माणूस

जपानमधील हा कैदी ठरला सर्वाधिक काळ फाशीची वाट पाहणारा माणूस

इतका दीर्घकाळ फाशीच्या शिक्षेची वाट पाहणारा तो पहिलाच माणूस आहे.

इतका दीर्घकाळ फाशीच्या शिक्षेची वाट पाहणारा तो पहिलाच माणूस आहे.

इतका दीर्घकाळ फाशीच्या शिक्षेची वाट पाहणारा तो पहिलाच माणूस आहे.

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : सर्वसाधारणपणे आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की तात्काळ शिक्षा दिली जाते. अनेक देशांमध्ये या प्रक्रियेचा कालखंड हा वेगवेगळा असतो. जपानमध्ये (Japan) अशाच प्रकारे मृत्यूदंडाच्या शिक्षेचे एक प्रकरण समोर आलं असून या ठिकाणी एका व्यक्तीला मागील 48 वर्षांपासून मृत्यूदंडाच्या शिक्षा देण्यासाठी ताटकळत (Death row awaiting) ठेवण्यात आलं आहे. यामुळं या व्यक्तीच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Records) नोंदवण्यात आलं असून इतका दीर्घकाळ फाशीच्या शिक्षेची वाट पाहणारा तो पहिलाच माणूस आहे. 84 वर्षीय इवाओ हाकमाडा (Iwao Hakamada) असे या व्यक्तीचे नाव असून 48 वर्षांपूर्वी त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. या व्यक्तीला आपला बॉस, त्याची पत्नी आणि मुलांची हत्या केल्याप्रकरणी 1966 मध्ये अटक करण्यात आली होती. जपानमधील शिजूओका (Shizuoka) मध्ये चाकूने या सर्वांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात त्याच्यावर दरोडा आणि खुनाचा आरोप करत त्याला अटक केली होती. सुरुवातीला त्याने या हत्या प्रकरणात आपण हा गुन्हा केल्याचं कबुल केलं होतं. परंतु त्यानंतर त्याने हा आरोप चुकीचा असल्याचं म्हटलं. पोलिसांनी आपल्याला मारहाण करत आपल्याकडून खुनाचा आणि दरोड्याचा गुन्हा कबुल करून घेतल्याचा आरोप त्याने केला होता. परंतु पोलिसांनी मजबूत पुरावे सादर केल्याने त्याला कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर 2014 मध्ये त्याला जेलमधून सोडण्यात आलं. इतक्या वर्षात त्याच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्यात आली नाही. वर्ल्ड कारागृह संग्रहालयाच्या वेबसाइटनुसार जपानमध्ये इतर विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी लोकांना तुरूंगात टाकले जाते. जपानमध्ये 1 लाख लोकांपैकी केवळ 39 लोकांना तुरुंगात टाकले जाते तर अमेरिकेत हे प्रमाण 655 आणि स्पेनमध्ये 124 इतके आहे. 6 वर्षांपूर्वी नवीन आदेश इतकी वर्ष त्याच्या शिक्षेवर अंमलबजावणी न झाल्यानं शिजूओका (Shizuoka) न्यायालयानं त्याचे वय आणि मानसिक परिस्थिती पाहता त्याला जेलमधून सोडण्याचा 2014 मध्ये आदेश दिला. त्याचबरोबर यासंबंधी एक पुनर्विचार (retrial) याचिका देखील टोकियाच्या उच्च न्यायालयात दाखल केली. परंतु उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर त्याने जपानच्या सुप्रीम कोर्टात यासंबंधी याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा टोकियो उच्च न्यायालयात(Tokyo High Court) यासंदर्भात सुनावणी होणार आहे. हाकमाडाची वकील किओमी सानुनागो यांनी याविषयी सांगितले की, त्यांना अटक करून मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची शक्यता होती. परंतु आता पुन्हा सुनावणी होणार असल्यानं ते सध्या सुरक्षित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या भावाने आणि बहिणीने देखील पुन्हा पोलिसांवर आरोप करत हाकमाडा यांना जबरदस्ती अटक करून आणि त्यांच्याकडून जबरदस्ती गुन्हा कबुल करून घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं आता टोकियो उच्च न्यायालयात काय होते याकडे त्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जपान आणि अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेबद्दल खूप विरोधाभास असून अमेरिकेत ठरलेल्या तारखेला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते तर जपानमध्ये अतिशय गुप्त पद्धतीने ही शिक्षा दिली जाते.
First published:

Tags: Japan

पुढील बातम्या