पोरबंदर, 8 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला जोरदार यश मिळालं आहे. 182 पैकी 158 जागांवर भाजपकडे आघाडी आहे, तर काँग्रेसला 17, आपला 4 आणि इतर पक्षांना 4 जागांवर आघाडी मिळाली आहे. हाच कल कायम राहिला तर भाजप गुजरातच्या इतिहासातील सगळ्यात मोठा विजय मिळवेल. याआधी 1980 साली काँग्रेसला 1980 साली माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वात 183 पैकी 149 जागा मिळाल्या होत्या.
गुजरात विधानसभा निवडणुकीत पोरबंदरची कुटियाना सीट कायमच चर्चेचा विषय ठरते. कुटियाना सीट आणि संतोकबेन जडेजा असं समीकरणच गुजरातमध्ये झालं आहे. कुटियानामधून लेडी डॉन संतोकबेन जडेजा यांचा मुलगा कांधल जडेजा समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. कांधल जडेजा कुटियानामधून आघाडीवर आहे.
कांधल जडेजाना 2012 आणि 2017 साली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलं होतं. या दोन्ही निवडणुकींमध्ये कांधल जडेजा यांचा विजय झाला होता. यावेळी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर कांधल जडेजाना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे नाराज झालेल्या कांधल जडेजा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला, यानंतर अखिलेश यादव यांनी कंधाल जडेजा यांना तिकीट दिलं.
तीनपैकी दोन विरोधक आपल्याच ताफ्यात घेतले, भाजपने फिरवलेली भाकरी ठरली गेम चेंजर!
कांधल जडेजा सध्या 41,720 मतांसह आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या ढेलीबेन ओडेडारा आहेत, पण या दोन्ही उमेदवारांमध्ये मतांचा फरक मोठ्या प्रमाणावर आहे. ढेलीबेन आढेदरा यांना आतापर्यंत 24,426 मतं मिळाली आहेत.
कोण आहेत कांधल आणि संतोकबेन?
गुजरातच्या कुटियानामध्ये संतोकबेन जडेजा यांचा कायमच दबदबा राहिला आहे. संतोकबेन स्वत: या सीटवरून आमदार झाल्या होत्या यानंतर इथूनच त्यांचा मुलगाही विजयी झाला. संतोकबेन या भागात लेडीडॉन म्हणून ओळखली जाते. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार संतोकबेनवर 500 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. एवढच नाही तर संतोकबेनवर एक चित्रपटही आला होता. कांधल जडेजा यांच्यावरही या भागात अनेक गुन्हे दाखल आहेत, असं असलं तरी या मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे.
गुजरातमध्ये सातव्यांदा कमळ कसं फुललं? भाजपच्या विजयाची Inside Story
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat, NCP, Sharad Pawar