मराठी बातम्या /बातम्या /देश /

Gujarat Election Results : तीनपैकी दोन विरोधक आपल्याच ताफ्यात घेतले, भाजपने फिरवलेली भाकरी ठरली गेम चेंजर!

Gujarat Election Results : तीनपैकी दोन विरोधक आपल्याच ताफ्यात घेतले, भाजपने फिरवलेली भाकरी ठरली गेम चेंजर!

Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. 2017 च्या निवडणुकीत आव्हान देणाऱ्या तीन पैकी दोन विरोधकांना भाजपने पक्षात घेतलं, ज्याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे.

Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. 2017 च्या निवडणुकीत आव्हान देणाऱ्या तीन पैकी दोन विरोधकांना भाजपने पक्षात घेतलं, ज्याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे.

Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. 2017 च्या निवडणुकीत आव्हान देणाऱ्या तीन पैकी दोन विरोधकांना भाजपने पक्षात घेतलं, ज्याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Gandhinagar, India
  • Published by:  Shreyas

गांधीनगर, 8 डिसेंबर : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार भाजपला 182 जागांपैकी 156 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर काँग्रेस 18, आप 5 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहे. हे कल पाहता गुजरातमध्ये भाजप सलग सातव्यांदा विजयी होणार हे निश्चित झालं आहे. गुजरातच्या इतिहासातला कोणत्याही राजकीय पक्षाचा हा सगळ्यात मोठा विजय ठरेल. याआधी काँग्रेसने 1980 साली माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वात 183 पैकी 149 जागा जिंकल्या होत्या.

या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असली तरी मागच्या म्हणजेच 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती, त्यामुळे भाजपला 100 जागांवरही विजय मिळवता आला नाही. मागच्या निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या. 2017 साली भाजपला दमवण्यामध्ये तीन चेहऱ्यांची भूमिका महत्त्वाची राहिली, पण यावेळी मात्र या तीन पैकी दोन चेहरे भाजपने आपल्याच ताफ्यात घेतले.

हार्दिक पटेल

2017 निवडणुकीआधी हार्दिक पटेल पाटीदार आरक्षण आंदोलनातून उदयास आला, पण या निवडणुकीच्या काही काळ आधी हार्दिक पटेलने काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने हार्दिक पटेलला त्याचं होमग्राऊंड असलेल्या विरमगाममधून तिकीट दिलं. या निवडणुकीत हार्दिकचा सामना काँग्रेसचे सध्याचे आमदार लाखाभाई भरवाड यांच्याविरुद्ध आहे. काँग्रेससाठी ही जागा मजबूत आहे, कारण मागच्या दोन्ही निवडणुकीत इथून काँग्रेसचाच आमदार निवडून आला. हार्दिक पाटीदार समाजातून तर लाखाभाई भरवाड मागासवर्गातून येत असल्यामुळे इकडे जोरदार टक्कर होत आहे.

अल्पेश ठाकोर

अल्पेश ठाकोर याने गुजरात क्षत्रिय ठाकोर सेना बनवून दारू विरोधी आंदोलन करत ओळख बनवली. अल्पेश ठाकोर भाजपच्या तिकीटावर गांधीनगर दक्षिणमधून निवडणूक लढवत आहे. अल्पेशचा सामना इकडे काँग्रेसच्या हिमांशू पटेल आणि आपच्या देवेंद्र पटेल यांच्याशी आहे. 2017 साली अल्पेश ठाकोर काँग्रेसच्या तिकीटावर बनासकांठाच्या राधनपूरमधून आमदार झाले होते, पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राधनपूरच्या पोटनिवडणुकीत अल्पेश ठाकोर यांचा पराभव झाला, त्यामुळे यंदा भाजपने अल्पेशला गांधीनगर दक्षिणमधून उमेदवारी दिली. हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो, कारण इकडून त्यांचा वारंवार विजय होत आला आहे.

जिग्नेश मेवाणी

गुजरातच्या दलित राजकारणाचा चेहरा म्हणून ओळख मिळवलेला जिग्नेश मेवाणी काँग्रेसकडून वडगाम मतदारसंघातून रिंगणात आहे. जिग्नेश मेवाणीविरुद्ध भाजपने 2012 साली वडगाममधून काँग्रेसच्या तिकीटावर जिंकलेल्या मणिलाल वाघेला यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर आप आणि एमआयएमचा उमेदवारही आहे. जिग्नेश मेवाणी 2017 सालच्या निवडणुकीत वडगाममधून अपक्ष निवडून आले होते, पण काँग्रेसने त्यांचं समर्थन केलं होतं. आता जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये असून ते राहुल गांधींचे जवळचे मानले जातात. ओवेसींच्या एमआयएमने इकडे उमेदवार दिल्यामुळे जिग्नेश मेवाणी यांच्यासाठी आव्हान उभं ठाकलं आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांनी भाजपला तगडं आव्हान दिलं होतं, पण यावेळी भाजपने या तीन पैकी हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांना पक्षात घेतलं. याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणावर झाला, कारण पाटीदार आणि ओबीसी समाजाची मतं मिळवण्यात भाजपला मोठ्या प्रमाणावर यश आलं आहे.

भाजपच्या जातीय समिकरणाची Inside Story, गुजरातमध्ये असा मिळाला विजय

First published:

Tags: Amit Shah, BJP, Gujarat, Narendra modi