अहमदाबाद 08 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असं दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचं काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच आहे. यादरम्यानच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मतमोजणी पूर्ण होण्याआधीच काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.
Gujarat Election Results 2022 : काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला, निकालाआधीच मोठा निर्णय
घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना तात्काळ राजस्थानमध्ये हलवण्यात येणार आहे.
सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आधीच सावध पवित्रा घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या विजयी आमदारांना आज रात्री 8 वाजेपर्यंत जयपूरला हॉटेलमध्ये हलवलं जाईल. याबद्दलची पुष्टी अशोक गेहलोत करतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
काँग्रेसचा प्लॅन बी तयार आहे. अपेक्षेपेक्षा जास्त निकाल लागल्यास आमदारांना आधी हिमाचलमधील एका वेगळ्या ठिकाणी आणि नंतर राजस्थानला नेले जाईल. भूपेश बघेल आणि भूपेंद्र हुडा हे निरीक्षक आहेत.
Gujarat Election Results 2022 LIVE : गुजरातचं चित्र स्पष्ट, भाजपला बहुमत; हिमचालकडे लक्ष
गुजरातमध्ये आतापर्यंत लागोपाठ 6 वेळा भाजपची सत्ता आली आहे. आता एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर लागोपाठ सातव्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलेल. 2017 साली काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. भाजपला 100 च्या आत रोखण्यात काँग्रेसला यश आलं होतं. 2017 च्या निकालामध्ये भाजपला 99 आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने गुजरातमध्ये 1962, 1967 आणि 1972 मध्ये पहिल्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat, Rahul gandhi