Gujarat Election Results 2022 LIVE : गुजरातमध्ये मतमोजणी सुरू असताना काँग्रेस उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न

Gujarat Election Results 2022 LIVE : गुजरातमध्ये 5 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. शपथविधीची तारीख ठरल्याची चर्चा आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. हिमाचलमध्ये आम्ही सत्तेत येऊ असा काँग्रेस नेत्यांनी दावा केला आहे. त्यामुळे या निकालाकडे लक्ष आहे.

 • News18 Lokmat
 • | December 08, 2022, 15:39 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  16:1 (IST)

  पंतप्रधान मोदींची जादू जगभर - एकनाथ शिंदे
  'फडणवीसांनी गुजरातमध्ये विशेष मेहनत घेतली'
  निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक

  15:36 (IST)

  गुजरातमध्ये मतमोजणी सुरू असताना काँग्रेस उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न 
  गुजरातमध्ये मतमोजणी सुरू असताना काँग्रेसच्या उमेदवाराचं धक्कादायक पाऊल 
  मतमोजणी सुरु असतानाच आत्महत्येचा प्रयत्न
  पक्षाने या उमेदवाराला गांधीधाममधून तिकीट दिले होते
  काँग्रेसच्या उमेदवाराने असे पाऊल का उचलले हे अद्याप समजलं नाही

  15:14 (IST)

  एक्झिट पोलनुसारच गुजरातचे निकाल - अजित पवार
  गुजरातमध्ये 'आप'मुळे कॉंग्रेसला फटका - अजित पवार

  15:5 (IST)

  गुजरात विजयाबद्दल भाजपचं अभिनंदन - उद्धव ठाकरे
  गुजरातचा विजय विक्रमी, ऐतिहासिक - उद्धव ठाकरे
  उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचंही अभिनंदन

  13:47 (IST)

  गुजरातमध्ये भाजपचा विजय ऐतिहासिक
  गुजरातमध्ये भाजपला रेकॉर्डब्रेक यश
  भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
  गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विक्रम
  गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
  गुजरातमध्ये भाजपचा कॉंग्रेसला धोबीपछाड
  गुजरातमध्ये 12 डिसेंबरला शपथविधी सोहळा
  शपथविधीला मोदी, शाह उपस्थित राहणार
  पंतप्रधान मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात
  मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार
  हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसला घवघवीत यश
  हिमाचलमध्ये कॉंग्रेस सत्तास्थापनेचा दावा करणार

  13:43 (IST)

  गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? 12 डिसेंबरला होणार शपथविधी
  गुजरात निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत
  भाजपला बहुमत मिळताना दिसत असून शपथविधीची तारीखही ठरली आहे
  गांधीनगर येथे १२ डिसेंबर रोजी  होणार शपथविधी
  विधानसभेच्या मागे असलेल्या मैदानात होणार शपथविधी
  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक नेते होणार सहभागी

  12:0 (IST)

  गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
  'न्यूज18 लोकमत'वर निकालाचं महाकव्हरेज
  गुजरातमध्ये भाजप रेकॉर्डब्रेक विजयाच्या वाटेवर
  गुजरातमध्ये भाजपचा कॉंग्रेसला धोबीपछाड
  भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
  गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
  गुजरातमध्ये 11 किंवा 12 तारखेला शपथविधी - सूत्र

  पंतप्रधान मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात
  मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार
  गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी
  मोदींकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
  मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून शुभेच्छा

  हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस विजयाच्या दिशेनं
  विजयी कॉंग्रेस आमदारांना जयपूरला पाठवणार
  कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिमल्यात दाखल 

  11:35 (IST)

  हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच कायम

  11:30 (IST)

  11 किंवा 12 तारखेला गुजरातमध्ये शपथविधी सूत्रांची माहिती 

  11:20 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात जाणार.. विजयानंतर कार्यकर्त्यांना करणार संबोधित.. अमित शाहादेखील उपस्थित राहणार..

  गांधीनगर, 8 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असं दिसत आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडूनही अनेकांनी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, तसंच या निवडणुकीत काँग्रेसचं काय होणार? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये होते. शेवटच्या काळात राहुल गांधी त्यांची भारत जोडो यात्रा स्थगित करून गुजरात निवडणुकीच्या प्रचाराला आले.

  गुजरातमध्ये आतापर्यंत लागोपाठ 6 वेळा भाजपची सत्ता आली आहे. आता एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर लागोपाठ सातव्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलेल. 2017 साली काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. भाजपला 100 च्या आत रोखण्यात काँग्रेसला यश आलं होतं. 2017 च्या निकालामध्ये भाजपला 99 आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या.

  काँग्रेसने गुजरातमध्ये 1962, 1967 आणि 1972 मध्ये पहिल्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर लढलेल्या निवडणुकांमध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील पक्षांच्या आघाडीने, काँग्रेसचे बंडखोर नेते चिमणभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील जनसंघ आणि किसान मजदूर पक्षाचा पराभव केला. त्यानंतर 1980 आणि 1985 च्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. 1990 च्या निवडणुकीत जनता दल आणि भाजप एक मजबूत शक्ती म्हणून उदयास आले. 1995 नंतर झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत.