नवी दिल्ली, 20 जून: Coronavirus च्या धोक्यामुळे केंद्र सरकार यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन ‘डिजिटल’ व्यासपीठावर साजरा करणार आहे. Yoga at Home, Yoga with Family अशी यंदाची थीम आहे. #MyLifeMyYoga या हॅशटॅगबरोबर Twitter ने या डिजिटल योग दिनानिमित्त नवी इमोजीही सादर केली आहेत. जागतिक योग्य दिनाला गेल्या वर्षी मोठं सादरीकरण झालं होतं. पण या वेळच्या योग दिनाची संकल्पना घरच्या घरी योगासनं अशीच असल्याची माहिती,केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिली आहे. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर लोक एका ठिकाणी जमू शकणार नाहीत. म्हणून या वेळी डिजिटल योगदिन साजरा होणार आहे. त्यासाठी सोशल मीडियाही सज्ज झाला आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 21 जूनला (रविवारी) सकाळी 7 वाजता लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर योग दिनाच्या सोहळ्यात लोक सहभागी होऊ शकतील. जगभरातील भारतीय मिशन (दूतावास ) देखील या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जोडले जातील. मंत्रालयाने यावर्षी लेहमध्ये योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. पण ती रद्द करावी लागली. पंतप्रधान मोदींनी 31 मे रोजी ‘माय लाइफ, माय योगा’ या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धा जाहीर केली होती. आयुष मंत्रालय आणि आयसीसीआर योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना योग दिवसात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याची योजना आहे. सूर्यग्रहण पाहायचं असेल तर ही काळजी घ्या, महाराष्ट्रात असं दिसेल ग्रहण! ही स्पर्धा दोन भागात विभागली जाईल. प्रथम, व्हिडिओ ब्लॉगिंगच्या विजेत्यांची निवड केली जाईल आणि दुसर्या क्रमांकावर या विजेत्यांना जागतिक विजेत्यांसह स्पर्धा करावी लागेल. यासाठी, सहभागींनी तीन योग आसनाचा तीन मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करावा लागेल. भारतीय विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 25 हजार रुपये असणार आहे. डिप्रेशनमुळे क्रिकेटरने वडिलांनाही गमावलं; सुशांतप्रमाणेच संपवलं आयुष्य

)







