Home /News /national /

सुशांत तु घाई का केलीस? बिहारच्या IPS अधिकाऱ्याची काळजाला भिडणारी पोस्ट!

सुशांत तु घाई का केलीस? बिहारच्या IPS अधिकाऱ्याची काळजाला भिडणारी पोस्ट!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. फक्त सुशांतच नाही याआधीही नैराश्यातून या बॉलिवूड कलाकारांनी आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. फक्त सुशांतच नाही याआधीही नैराश्यातून या बॉलिवूड कलाकारांनी आत्महत्या केली.

'आयुष्याच्या प्रवासात असे चढ उतार येत असतातच, थोडं धैर्य दाखवलं असतं तर समाधान निश्चित झालं असतं. पण हे मी तुला आधी सांगू शकलो नाही याची खंत आहे.'

    पाटना 20 जून: सुशांत सिंह राजपूत हा बिहारचा सुपूत्र होता. त्याच्या आत्महत्येनंतर देशातली तरुणाई हळहळली. मात्र बिहारच्या लोकांना त्याचं जाणं हे चटका लावून गेलं. बिहारचे IPS अधिकारी विकास वैभव यांनी अतिशय भावुक पोस्ट करत सुशांतबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुशांत तु घाई का केलीस, आयुष्यातल्या प्रवासात असे चढ उतार येत असतात. थोडं थांबायला पाहिजे होतं असं त्यांनी म्हटलं आहे. विकास वैभव यांची अतिशय सचोटीचे अधिकारी म्हणून ख्याती आहे. टिपीकल पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतिमेत ते अडणारे नाहीत. पर्यावरण, प्राचिन वारसा, परंपरा, फोटोग्राफी अशा अनेक गोष्टींची त्यांना आवड आहे. सुशांत हा बिहारचा सुपूत्र असल्याने सगळ्यांनाच या उमद्या कलाकाराबद्दल विशेष प्रेम होतं. आयुष्याच्या प्रवासात असे चढ उतार येत असतातच, थोडं धैर्य दाखवलं असतं तर समाधान निश्चित झालं असतं. पण हे मी तुला आधी सांगू शकलो नाही याची खंत आहे. असे अवघड क्षण क्षणिक असतात असंही त्यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची मुंबई पोलिसांनी जवळपास 11 तास चौकशी केली. त्यामध्ये तिने सुशांतच्या शेवटच्या दिवसांबद्दल, त्यांच्या रिलेशनबद्दल आणि नैराश्याबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. पण त्यांच्या जॉइंट कंपन्यांबाबत काही माहिती दिली नाही. पोलीस तपासात सुशांत आणि रियाच्या एकत्रित कंपन्यांविषयीची माहिती समोर आली आहे. सुशांतच्या तीन कंपन्यांपैकी दोनात रिया डायरेक्टर होती. प्रत्यक्ष आयुष्यात कसा होता सुशांत सिंह राजपूत? त्याचे कधीही न पाहिलेले VIDEO रियाने या आर्थिक व्यवहारांविषयी पोलिसांना अद्याप कुठलीही माहिती आपणहून दिलेली नाही. त्यामुळे पोलीस या दोघांच्या आर्थिक व्यवहारांविषयी माहिती काढण्यासाठी रियाने पुन्हा एकदा चौकशी करू शकतात. सुशांतने त्याच्या आतापर्यंतच्या कमाईतला मोठा हिस्सा स्वतः सुरू केलेल्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवला होता. सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने घेतला मोठा निर्णय, सोशल मीडियावर होतेय चर्चा त्या तीनपैकी दोन कंपन्यांमध्ये रिया त्याची पार्टनर होती. एका कंपनीत तर रियाबरोबर तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीसुद्धा डायरेक्टर असल्याचं पोलिसांच्या निदर्शनाला आलं आहे. सुशांतच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही गुंतागुंत नव्हती ना याची खातरजमा करण्यासाठी पोलीस सुशांतच्या चार्टर्ड अकाउंटच्या संपर्कात आहेत. दरम्यान, बऱ्याच काळापासून सुशांत सिंह राजपूतच्या बेस्ट फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या संदीप सिंहनं त्याच्या सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यानं अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ही पोस्ट त्यानं अंकिताला उद्देशून लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं सुशांत आणि अंकितासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांतच्या लाइफमध्ये अंकिताला किती महत्त्व होतं हे सुद्धा त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टसोबत त्यानं अंकिता आणि सुशांतसोबतचा होळीचा फोटो शेअर केला आहे.
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या