मराठी बातम्या /बातम्या /देश /परदेशी जाणाऱ्या प्रवाशांवर कस्टम विभागाची नजर, वाचा का कडक झाला नियम!

परदेशी जाणाऱ्या प्रवाशांवर कस्टम विभागाची नजर, वाचा का कडक झाला नियम!

देशात सोन्याची आयात (Gold import) करायची असेल तर त्यावर 15 टक्के आयात शुल्क आहे. हे आयात शुल्क मोठं असल्याने देशात सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

देशात सोन्याची आयात (Gold import) करायची असेल तर त्यावर 15 टक्के आयात शुल्क आहे. हे आयात शुल्क मोठं असल्याने देशात सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

देशात सोन्याची आयात (Gold import) करायची असेल तर त्यावर 15 टक्के आयात शुल्क आहे. हे आयात शुल्क मोठं असल्याने देशात सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

  नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : विमानाने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची अत्यंत कसून तपासणी होत असते. तरीही प्रवाशांकडून काही प्रमाणात तस्करी सुरू असते, आर्थिक गुन्हेगार देशातून पळून जाण्याचे प्रकारही घडतात. असे प्रकार होऊ नयेत यासाठी आणखी कडक पावलं उचलली जाणार आहेत. देशात बेकायदा पद्धतीने वस्तूंची आयात होऊ नये, यासाठी कस्टम्स अर्थात सीमाशुल्क विभाग (Custom) एक धोरण विकसित करत आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  काय आहे धोरण?

  सीमाशुल्क विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या या रणनीतीचा भाग म्हणून आता विमान कंपन्यांनी (Airlines Company) परदेश प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सीमाशुल्क विभागाला सादर करणं बंधनकारक होणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस (CBIC) अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय विमानप्रवास (International Air Travellers) करणाऱ्या प्रवाशांची माहिती विमान कंपन्यांना पाच वर्षं सांभाळूनही ठेवावी लागणार आहे. गरज पडल्यास सीमाशुल्क विभाग (Customs Department) या माहितीचं रिस्क अ‍ॅनालिसिस (Risk Analysis) अर्थात जोखीम विश्लेषण करणार आहे.

  त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती गरज पडल्यास तपास यंत्रणा, विविध सरकारी विभाग आणि अन्य देशांच्या सरकारांनाही सादर केली जाऊ शकते, असं त्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

  Covid Alert: कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, मुंबईतील रूग्णांच्या संख्येत 80 टक्के वाढ

  का घेतला निर्णय?

  देशात सोन्याची आयात करायची असेल तर त्यावर 15 टक्के आयात शुल्क आहे. हे आयात शुल्क मोठं असल्याने देशात सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सोन्याव्यतिरिक्त अन्य अनेक वस्तूंवरही मोठं आयातशुल्क लागू करण्यात आलं आहे. त्यामुळेच या वस्तूंची तस्करी अर्थात बेकायदा आयात वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर, असे संभाव्य प्रकार रोखण्यासाठी किंवा असे प्रकार झाल्यास त्यांचा छडा लावणं सोपं जावं म्हणून सीमाशुल्क विभाग रणनीती तयार करत आहे. त्याअंतर्गत, विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती सीमाशुल्क विभागाला द्यावी लागणार आहे.

  'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती त्यांच्या विमानाचं उड्डाण होण्याच्या 24 तास आधी सीमाशुल्क विभागाला सादर करावी लागणार आहे. परदेशातून येणाऱ्या आणि परदेशात जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या विमानांतल्या प्रवाशांच्या माहितीचा यात समावेश असेल. त्यात संबंधित प्रवाशाचं नाव, बिलिंग किंवा पेमेंट कोणत्या माध्यमातून केलं म्हणजेच क्रेडिट कार्ड नंबर, तिकीट दिल्याची तारीख, संबंधित प्रवाशासोबत कोण प्रवास करत आहे, पीएनआर क्रमांक, मोबाइल-ई-मेल आदी संपर्क, ट्रॅव्हल एजन्सीचं नाव, बॅगेजची माहिती, तसंच अन्य विमान कंपनीच्या विमानातलं आरक्षण करणाऱ्या विमान कंपनीची कोड शेअर इन्फॉर्मेशन आदी प्रकारची माहिती सीमाशुल्क विभागाला द्यावी लागणार आहे.

  वऱ्हाडी बनून आले इन्कम टॅक्सचे अधिकारी आणि 390 कोटी शोधून काढले

  CBIC कडून यासाठी 'नॅशनल कस्टम्स टार्गेटिंग सेंटर-पॅसेंजर' ही यंत्रणा स्थापन करण्यात आली असून, ती यंत्रणा या माहितीचं विश्लेषण करील. कस्टम्स कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी, तसंच त्यांच्या तपासासाठी या माहितीचा वापर केला जाणार आहे. देशातून पळून जाऊ इच्छिणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांना आधीच पकडण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Airport, Travel by flight