आनंदाची बातमी! गोवाही झालं कोरोनामुक्त, 3 एप्रिलनंतर एकही रुग्ण नाही

आनंदाची बातमी! गोवाही झालं कोरोनामुक्त, 3 एप्रिलनंतर एकही रुग्ण नाही

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आलं होतं. याशिवाय येथे जनता कर्फ्यूची मर्यादाही वाढवली होती.

  • Share this:

पणजी, 19 एप्रिल : देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर वाढत आहे. आतापर्यंत देशात 15712 रुग्ण समोर आले आहेत. यापैकी गेल्या 24 तासात कोविड – 19 (Covid - 19) चे 1334 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर देशात आतापर्यंत 507 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान गोव्यातून (Goa) एक चांगली बातमी समोर आली आहे. राज्यात 3 एप्रिलनंतर एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आलेला नाही. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आनंद व्यक्त केला यावेळी ते म्हणाले, की मी सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो. त्यांच्या मेहनतीमुळेच 3 एप्रिलनंतर राज्यात कोणताही पॉझिटिव्ह केस समोर आलेला नाही. सावंत यावेळी म्हणाले की 1 शेवटची केस होती त्याचाही निकाल निगेटिव्ह आला आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यावेळी म्हणाले की, गोव्यात सध्या एकही कोरोना पॉझिटिव्ह केस नाही. येथे कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. येथील आतापर्यंत पॉझिटिव्ह असलेले रुग्ण निगेटिव्ह आले आहेत.

संबंधित -गृहमंत्रालयाने जारी केली नवी गाईडलाइन, संसर्ग नसल्यास मजुरांची कामावर रवानगी

‘या’ जिल्ह्यात पेन्शनची होम डिलिव्हरी, 29000 ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळाले

First published: April 19, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या