केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली नवी गाईडलाइन, संसर्ग नसल्यास मजुरांची कामावर रवानगी

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली नवी गाईडलाइन, संसर्ग नसल्यास मजुरांची कामावर रवानगी

मजुरांना राज्याबाहेर जाता येणार नाही तर त्यांची तपासणी केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 एप्रिल : केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोना (Coronavirus) व्हायरसमुळे जारी केलेल्या ल़ॉकडाऊनमध्ये दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. गृह मंत्रालयाने (Home Minister) राज्य वा केंद्र शासित प्रदेशअंतर्गत अडकलेल्या मजुरांच्या प्रवासासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम जारी केलं आहे. यामध्ये मजुरांना सद्यस्थितीत जेथे राहत आहात तेथेच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय सांगण्यात आलं आहे की, केंद्र शासित प्रदेश आणि राज्यांबाहेर त्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रवास होणार नाही. गृहमंत्रालयाने प्रवासी मजुरांच्या प्रवासाबाबत निर्देश दिले आहेत. ज्यानुसार प्रवासी मजूर ज्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशातील शिबिरात राहतात. त्यांची तेथील स्थानिक प्रशासनाद्वारे नोंदणी करण्यात येईल आणि त्यांना त्यांना कौशल्यानुसार काम उपलब्ध करुन देण्यात येईल. लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांमध्ये प्रवासी मजुर अडकून पडले आहेत. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता सध्या वाहतूक व्यवस्था सुरू करता येऊ शकत नाही. मात्र सरकारने यावर उपाययोजना शोधून काढली आहे.

राज्यात राहून करावे लागणार काम

सरकारनतर्फे सध्या राहत असलेल्या राज्यात काम करण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांची स्क्रिनिंग करण्यात येईल. ज्या मजुरांमध्ये कोणतेही लक्षण नसेल त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचविण्यात येईल.

राज्या-राज्यांमध्ये मजुरांना प्रवास करता येणार नसल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. मजुरांना बसमधून प्रवास करीत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असेल.

संबंधित - गावी परतणाऱ्या पाहुण्यांमुळे रायगडकर भयभीत, हजारो लोकं पोहोचले पायी!

‘या’ जिल्ह्यात पेन्शनची होम डिलिव्हरी, 29000 ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळाले पैसे

Tik Tok व्हिडिओ तयार करून आव्हान देणं पडलं महागात, पोलिसांनी दाखवला हिसका!

First published: April 19, 2020, 6:16 PM IST

ताज्या बातम्या