पणजी, 22 मार्च : गोव्याची राजधानी पणजी (Panjim ) महानगरपालिकेसह (Panjim Municipal Corporation Election 2021) ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरू आहे. पण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod swant) यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेल्या साखळी पालिकेच्या पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने साखळी पोटनिवडणुकीत बाजी मारून भाजपला धक्का दिला आहे.
प्रभाग क्र. 9 साठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेस अशी लढत होती. पक्षीय पातळीवर निवडणूक झाली नसली तरी दोनच उमेदवार या रिंगणात असल्याने या निवडणुकीला भाजप विरुद्ध काँग्रेस असे लढतीचे स्वरूप आले होते.
भाजप पुरस्कृत म्हणून दशरथ आजगावकर यांच्यासमोर रमेश आमशेखर यांचे आव्हान होते. त्यात धर्मेश सगलानी आणि प्रवीण ब्लेगन यांच्या नेतृत्वाखाली आमशेखर रिंगणात होते. भाजपसाठी ही लढत प्रतिष्ठीत होती. 5-5 बलाबल असलेल्या या पालिकेच्या सत्तेत कोण येणार? हे या पोटनिवडणुकीवर अवलंबून होते.
या निवडणुकीत प्रचाराची सर्व सूत्रे मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे होती. तरीही काँग्रेसने ही जागा आपल्याकडे खेचत डॉ. सावंत यांना आणि भाजपला मोठी चपराक दिली आहे. त्यामुळे साखळी पालिकेवर काँग्रेसचा झेंडा लागला असून ही भाजपसाठी आत्मचिंतनाची बाब बनली आहे.
पणजी पालिकेवर भाजपचा झेंडा
दरम्यान, पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. एकूण 30 जागांसाठी ही मतमोजणी घेण्यात आली होती. जाहीर झालेल्या निकालानुसार, 30 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. 30 पैकी 25 जागा भाजपने जिंकल्या आहे. 25 जागांवर भाजप पुरस्कृत प्रोग्रेस फॉर टूगेदर या पॅनेलचे उमेदवारांनी विजय मिळवला आहे. बहुमतासाठी लागणारा 16 जागांचा जादुई आकडा भाजपने गाठला आहे. त्यामुळे पणजी महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे पुरस्कृत केवळ 5 जण निवडून आले. अन्य निकाल अद्यापही प्रलंबित आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपने जोरदार आघाडी घेतली होती. अखेर ही आघाडी आता विजयामध्ये रुपांतरीत झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Goa Election 2021