मुंबई 22 मार्च: 'कभी कभी', 'चांदनी' 'सिलसिला' (Kabhi Kabhi, Chandni, Silsila) यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लिहिणारे लेखक, दिग्दर्शक सागर सरहदी (Sagar Sarhadi) यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते. राहत्या घरी दीर्घ आजारपणामुळं त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सागर सरहदी यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक नामांकित सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सागर यांचा जन्म 1933 साली कराची येथे झाला होता. भारत पाकिस्तान फाळणीनंतर ते दिल्ली येथे राहण्यास आले. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची प्रचंड आवड होती. अभिनय करणं त्यांना जमायचं नाही त्यामुळं त्यांनी मग लेखक होण्याचा निर्णय घेतला. अर्थात लिखाणात त्यांचा जम बसला परिणामी त्याकाळी अनेक प्रायोकिग नाटकांच्या पटकथा ते लिहू लागले. त्यांची जबरदस्त लिखाणाची शैली पाहून यश चोप्रा यांनी त्यांना कभी कभी या चित्रपटाची पटकथा लिहण्याची जबाबदारी दिली. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पुर्ण केली. अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट सुपरहिट झाला.
अवश्य पाहा - रणबीर-कतरिनाच्या नात्यात का आला दुरावा?; पाहा पडद्यामागील ब्रेकअप स्टोरी
View this post on Instagram
त्यानंतर जणू चित्रपटांची रांगच लागली. पुढे एकामागोमाग एक नूरी, चांदनी. सिलसिला, बाझार, फासले यांसरख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. बाझार या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील त्यांनी केलं होतं. या चित्रपटासाठी त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलं होतं. गेली काही वर्ष ते सिनेसृष्टीपासून दूर होते. दिर्घ आजारपणामुळं त्यांचं निधन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Death, Entertainment, Natural death, Sagar sarhadi