गोवा, 21 मे: गोवा राज्यात 31 मे रोजीपर्यंत कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरु असतील. दरम्यान राज्यात वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. याआधी गोव्यात 9 मे पासून ते 23 मे पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता. कर्फ्यूच्या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली.
गोवा सरकारनं वैद्यकीय सेवेस परवानगी आहे. तसंच किराणा मालाची दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त रेस्टॉरारंटद्वारे डिलिव्हरीला परवानगी असेल. ज्यात ऑर्डर घेण्यासाठी सकाळची वेळ निश्चित करण्यात आली होती. दरम्यान आता 23 मे रोजी संपणारा कर्फ्यू आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यावेळीही पूर्वी जारी केलेले कडक नियमच कायम राहतील, असं गोवा सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
#COVID19 | Goa Chief Minister Pramod Sawant has announced the extension of curfew up to May 31
(File pic) pic.twitter.com/apkzCGorSk — ANI (@ANI) May 21, 2021
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारनं कोविड- 19 कर्फ्यूवेळी मेडिकल, किराणा दुकान आणि मद्यपानाची दुकानं सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. कर्फ्यूच्या वेळी केवळ वैद्यकीय पुरवठ्यासह अत्यावश्यक सेवांना परवानगी असेल.
हेही वाचा- ब्लॅक फंगससंदर्भात High Courtनं राज्य सरकारला दिला मोलाचा सल्ला
किराणा मालाची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत खुली असतील. रेस्टॉरंट्सच्या टेकअवे ऑर्डरसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी आहे. तसंच दुसऱ्या राज्यातून किंवा परदेशातून गोव्यात येणाऱ्या लोकांचा कोविड- 19 चा रिपोर्ट निगेटीव्ह असणं अनिवार्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus, Goa, Lockdown, Night Curfew