मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतासाठी आता Global Tast Force: कोविडयुद्धात साथ देण्यासाठी 40 अमेरिकी कंपन्यांचे CEO करणार मदत

भारतासाठी आता Global Tast Force: कोविडयुद्धात साथ देण्यासाठी 40 अमेरिकी कंपन्यांचे CEO करणार मदत

भारताला साहाय्य करण्यासाठी अमेरिकेत खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या भागीदारीतून हा ग्लोबल टास्कफोर्स निर्माण करण्यात आला आहे.

भारताला साहाय्य करण्यासाठी अमेरिकेत खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या भागीदारीतून हा ग्लोबल टास्कफोर्स निर्माण करण्यात आला आहे.

भारताला साहाय्य करण्यासाठी अमेरिकेत खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या भागीदारीतून हा ग्लोबल टास्कफोर्स निर्माण करण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 28 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता भारतात गंभीर स्वरूप धारण केलं आहे. भारताला कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत करण्याकरिता अमेरिकेतल्या 40 आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO)एकत्र येऊन ग्लोबल टास्कफोर्स (Global Task Force) अर्थात जागतिक कृती दलाची स्थापना केली आहे.

यूएसचेंबर ऑफ कॉमर्सची (US chamber of Commerce) यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल, यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम अँड बिझनेस राउंडटेबल या सर्वांचा हा एकत्रित उपक्रमआहे. येत्या काही आठवड्यांत भारताला 20हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मिळवून देण्याची ग्वाही सोमवारी (26एप्रिल) झालेल्या या टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली. 'डेलॉइट'चे (Deloitte CEO)  सीईओ पुनीत रेंजेन (Puneet Renjen) यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

भारतात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने (Corona Second Wave)रौद्र रूप धारण केलं आहे. या पार्श्वभूमीवर, भारताला आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या वैद्यकीय बाबी, लशी, ऑक्सिजन आणि जीवरक्षणासाठी अन्य साह्य करण्यासाठी अमेरिकेत खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या भागीदारीतून हा ग्लोबल टास्कफोर्स निर्माण करण्यात आला आहे. ग्लोबल टास्क फोर्स ऑन पँडेमिक रिस्पॉन्स  - मोबिलायझिंग फॉर इंडिया' असं या टास्क फोर्सचं नाव आहे.

Explainer : देशात कोरोना वेगानं का पसरतोय; डबल म्युटंट व्हेरियंट ठरतोय कारणीभूत?

अशा प्रकारचा एखाद्या विशिष्ट देशापुरता, तिथल्या सार्वजनिक आरोग्याच्या विपरीत परिस्थितीशी लढण्यासाठी दुसऱ्या देशात तयार झालेला हा पहिला ग्लोबल टास्कफोर्स आहे. अमेरिकेचे गृहसचिव टोनी ब्लिंकन (Tony Blinken)यांनी या टास्कफोर्सच्या बैठकीला संबोधित केलं.

अमेरिकेतल्या खासगी क्षेत्रातल्याकंपन्यांच्या क्षमता आणि तज्ज्ञता यांचा भारतातल्या कोविड-19 (Covid19) स्थितीशी लढण्यासाठी कसा वापर करून घेता येऊ शकतो, याबद्दल टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली,अशी माहिती ब्लिंकन यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

'अनेकअमेरिकी कंपन्या एकत्र आल्या आहेत. शक्य त्या सर्व मार्गांनी सर्वोत्तममदत करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. पंतप्रधान म्हणालेत्याप्रमाणे, 'पहिल्या लाटेशी यशस्वीपणे लढल्यानंतर आत्मविश्वास वाढलाहोता;मात्र दुसऱ्या लाटेने देशाला हलवलं आहे.' अशा स्थितीत शक्य त्या सर्वमार्गांनी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे,' असं रेंजेन यांनी एका प्रश्नालाउत्तर देताना सांगितलं.

पहिला मुद्दा ऑक्सिजनच्या तुटवड्याचा आणिकॉन्सन्ट्रेटरचा आहे. म्हणूनच20हजार कॉन्सन्ट्रेटर येत्या काही आठवड्यांतभारताला देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे,असं रेंजेन यांनी सांगितलं.

त्यापैकी पहिले 1000 कॉन्सन्ट्रेटर्स (Oxygen Concentrates)याच आठवड्यात भारतात पोहोचतील. तसंच, पाच मेपर्यंत आणखी 11 हजार कॉन्सन्ट्रेटर्सहीपोहोचतील,असं त्यांनी स्पष्ट केलं.

Explainer : भारताला लसनिर्मितीसाठी अमेरिकेतून लागणार घटक, निर्यातबंदीमुळे अडचण

किमान 25 हजार कॉन्सन्ट्रेटर्स देणं हे आमचं उद्दिष्ट असून, शक्य झाल्यास त्यापेक्षाही अधिक कॉन्सन्ट्रेटर्स आम्ही देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

दुसरा मुद्दा 10 लिटर आणि 45 लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन सिलिंडर्सचा आणि मॉनिटरिंग किट्सच्या पुरवठ्याचा आहे,असं ते म्हणाले.

'या कंपन्या एकत्र आल्या आहेत हे पाहून खूप आनंद वाटतो,' असंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनचे नियम मोडणं पडलं भारी; बॉलिवूड अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यात झालेल्या फोनवरील चर्चेबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. अमेरिकेने भारताला तातडीने मदत करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करून दोन्ही देश परस्परांचे नैसर्गिक मित्र असल्याचं रेंजेन यांनी सांगितलं.

डेलॉइटचे सीईओ रेंजेन हरियाणातल्या रोहतक इथले असून, तिथल्या त्यांच्या अनेक नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसंच डेलॉइटच्या भारतातल्या 2000 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

'लशी, वैद्यकीय मदत, होम टेस्टिंग किट्स मिळण्यासाठी आम्ही साह्य करत आहोत. भारतात मोठ्या स्वरूपात काम करत असलेल्या सर्व संस्था/कंपन्या हे करत आहेत. सगळ्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी हे करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भूमिकाघेतली आहे. भारतीय टॅलेंटलाही सलाम,' असं रेंजेन यांनी सांगितलं.

ग्लोबल टास्क फोर्समध्ये रिटेल, ई-कॉमर्स, फार्मास्युटिकल, टेक्नॉलॉजी आणि मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचा सहभाग आहे.

जागतिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जागतिक पातळीवरून प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे. अमेरिकन बिझनेस कम्युनिटी तेच करत आहे, असं यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा सुझान क्लार्क यांनी सांगितलं.

अमेरिकेत असलेले भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू (Taranjit Singh Sandhu) यांच्याशी अमेरिकी कंपन्या समन्वय साधत आहेत. त्यांच्याकडून देशाच्या गरजा जाणून घेऊन त्यापूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचलली जात असल्याचं रेंजेन यांनी स्पष्ट केलं.

भारत आणि भारतीय यावर मात करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

First published:

Tags: Coronavirus, India america