मुंबई 28 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिलला (Jimmy Shergill) कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी पंजाब पोलिसांनी लुधियाना येथून त्याला ताब्यात घेतलं. (coronavirus) लॉकडाउनचे नियम झुगारुन तो चित्रपटाचं शूटिंग करत होता. (lockdown rules) शिवाय ज्या ठिकाणी त्याचं शूटिंग सुरु होतं, तिथं कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टंसिंग फॉलो केलं जात नव्हतं. अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. परिणामी लॉकडाउनचे नियम मोडल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
लुधियानामधील एका शाळेत चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. तेथील काही लोकांनी पोलिसांना या शूटिंग बाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी शाळेत पोहोचले. अन् तिथं खरोखरच एका पंजाबी चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. निर्मात्यांनी तिथं कोर्टाचा सेट लावला होता. विशेष म्हणजे तिथं उपस्थित असलेल्या क्रूमेंबर्सनं मास्क लावले नव्हते. सोशल डीस्टंसिंगचे नियम देखील मोडले होते. परिणामी पोलिसांनी अभिनेता जिमी शेरगिल सकट तेथील सर्वांना अटक केली. निर्मात्यांच्या मते विशेष परवानगी घेऊनच त्यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली होती. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
अक्षय कुमारनं केली मोठी मदत; कोरोना रुग्णांना पुरवले Oxygen Concentrator
भारतात मंगळवारी रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Corona updates, Crime