मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : देशात कोरोना वेगानं का पसरतोय; डबल म्युटंट व्हेरियंट ठरतोय कारणीभूत?

Explainer : देशात कोरोना वेगानं का पसरतोय; डबल म्युटंट व्हेरियंट ठरतोय कारणीभूत?

सध्याच्या या दुसऱ्या लाटेत डबल म्युटंट कोरोना व्हेरियंटमुळे (Double Mutant Covid Variant) साथीचं रूप भयानक होत असल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. याचबाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा मुखर्जी यांच्याशी न्यूज18 ने बातचीत केली आहे.

सध्याच्या या दुसऱ्या लाटेत डबल म्युटंट कोरोना व्हेरियंटमुळे (Double Mutant Covid Variant) साथीचं रूप भयानक होत असल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. याचबाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा मुखर्जी यांच्याशी न्यूज18 ने बातचीत केली आहे.

सध्याच्या या दुसऱ्या लाटेत डबल म्युटंट कोरोना व्हेरियंटमुळे (Double Mutant Covid Variant) साथीचं रूप भयानक होत असल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. याचबाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा मुखर्जी यांच्याशी न्यूज18 ने बातचीत केली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 22 एप्रिल : भारतातल्या कोरोनाबाधितांचा (Corona Cases in India) आकडा दररोज नवनवे विक्रम गाठत आहे. सध्याच्या या दुसऱ्या लाटेत डबल म्युटंट कोरोना व्हेरियंटमुळे (Double Mutant Covid Variant) साथीचं रूप भयानक होत असल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMR मध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा मुखर्जी यांच्याशी न्यूज18 ने डबल म्युटंट व्हेरियंटसंदर्भात चर्चा केली आणि याविषयी अधिक जाणून घेतलं. ती चर्चा येथे देत आहोत.

प्रश्न : कोरोना विषाणूचा डबल म्युटंट स्ट्रेन (Double Mutant Strain) म्हणजे नेमकं काय आहे? आतापर्यंत देशात आढळलेल्या स्ट्रेन्सच्या तुलनेत त्याची कार्यपद्धती वेगळी आहे का?

उत्तर : डबल म्युटंट व्हेरियंट असं ज्याला म्हटलं जातं, तो SARS-CoV2 या कोरोना विषाणूचा B.1.617 नावाचा प्रकार आहे. अन्य म्युटेशन्सशिवाय त्यात E484Q आणि L425R ही दोन महत्त्वाची म्युटेशन्स आढळली आहेत. त्यामुळे त्याची संसर्गशक्ती वाढली आहे, तसंच शरीराच्या प्रतिकार यंत्रणेच्या कक्षेत न येण्याची शक्यताही वाढली आहे, असं थिअरी सांगते.

प्रश्न : काळजी करण्यासारखा व्हेरियंट (Variant of Concern) म्हणजे काय? आणि डबल म्युटंट हा तसा व्हेरियंट आहे का?

उत्तर : विषाणूत म्युटेशन होऊन तयार झालेला नवा प्रकार म्हणजे व्हेरियंटमुळे संसर्गाची क्षमता आणि रोगाची तीव्रता वाढली असेल किंवा सार्वजनिक आरोग्यासाठी घ्यावयाच्या उपायांवर त्यामुळे मोठा परिणाम होत असेल, तर त्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न असं म्हटलं जातं. डबल म्युटंट व्हेरियंटवर सध्या संशोधन सुरू आहे; मात्र त्याला अद्याप व्हेरियंट ऑफ कन्सर्न असं म्हटलं गेलेलं नाही.

हेही वाचा - कोरोना विस्फोट: देशभरात ऑक्सिजनची कमी; नेमका कसा तयार केला जातो मेडिकल Oxygen

प्रश्न : भारतात सध्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला (Second Wave) डबल म्युटंट व्हेरियंट (Double Mutant Variant) कारणीभूत आहे का?

उत्तर : तसं सांगणं अवघड आहे. ही लाट सुरू होण्याच्या आधी काही महिन्यांपासूनच डबल म्युटंट व्हेरियंट सापडायला सुरुवात झाली होती.

प्रश्न : जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) म्हणजे काय? आणि त्याला पूर्वीपेक्षाही आता जास्त महत्त्व का प्राप्त झालं आहे?

उत्तर : विषाणू आपलं रूप कसं बदलतो आहे, हे जीनोम सिक्वेन्सिंगमुळे कळतं. त्यामुळे त्याचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी काही विशिष्ट उपाय राबवणं आवश्यक असलं, तर त्याचा अंदाजही बांधता येतो.

प्रश्न : जीनोम सिक्वेन्सिंगमुळे नेमकं काय साध्य होईल? कोरोनाच्या दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी आपल्या आरोग्य यंत्रणांना ते कसं मार्गदर्शक ठरेल?

उत्तर : सध्याच्या स्थितीनुसार जीनोम सिक्वेन्सिंगमधून मिळालेली माहिती आपल्याला सध्या पसरत असलेल्या व्हेरियंटबद्दल कल्पना देते; पण व्हेरियंटनुसार उपचारपद्धती बदलत नाही. कोव्हॅक्सिन लस दिलेल्या व्यक्तींचा सेरा (Sera) या व्हेरियंट न्यूट्रलाइज (Neutralise) करू शकतो, हे आता आपल्याला कळलं आहे. अशीच अन्य लशींबद्दलची माहितीही पुढे येईल. सध्याची आणि पुढच्या संभाव्य लाटा रोखण्यासाठी, त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आहे तो प्रतिबंध. कोविडच्या अनुषंगाने घातलेले नियम प्रत्येकाने पाळले पाहिजेत, मग त्यांनी लस घेतलेली असू दे किंवा नसू दे किंवा त्यांना पूर्वी संसर्ग झालेला असू दे वा नसू दे. हे सगळं जितकं शक्य होईल तितक्या प्रमाणात आणि जितक्या वेगाने शक्य होईल तितक्या वेगाने अंमलात आणणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus, Uk corona variant