मुंबई, 21 नोव्हेंबर: टीम इंडियाचा महान खेळाडू अनिल कुंबेळनं (Anil Kumble) 1999 साली पाकिस्तान विरुद्ध दिल्लीमध्ये झालेल्या टेस्टमध्ये एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. दक्षिण आफ्रिकेच्या ऑल राऊंडरनं एका इनिंगमध्ये 10 विकेट्स तर घेतल्याच. त्याचबरोबर मॅचमध्ये 111 रन देखील काढले. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या मॅचमध्ये त्यानं बॅट आणि बॉल या दोन्ही आघाडीवर जोरदार कामगिरी केली. सीन व्हाईटहेड असं या 24 वर्षांच्या आफ्रिकन ऑलराऊंडरचं नाव आहे. तो 2016 साली आफ्रिकेकडून अंडर 19 वर्ल्ड कप खेळला आहे. 4 दिवसांच्या फ्रँचायझी मालिकेत त्यानं साऊथ वेस्टर्नकडून खेळताना इस्टर्नसविरुद्ध ही ऐतिहासिक कामगिरी केली.
🔟 OF THE BEST 🤯 @swd_cricket spinner Sean Whitehead claimed a brilliant 10/36 in 12.1 overs in the second innings of his side's #4DaySeries match against @EasternsCricket
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 20, 2021
He also bagged 5/64 in the first innings to set a new SWD First-Class record of 15/100 👏#BePartOfIt pic.twitter.com/bneDh7l4Rs
इस्टर्नच्या टीमला शेवटच्या इनिंगमध्ये मॅच जिंकण्यासाठी 186 रनचं टार्गेट होतं. पण सीननं त्यांना कोणतीही संधी दिली नाही. त्यानं एकट्यानंच त्यांची पूर्ण टीम ऑल आऊट केली. सीननं फक्त 36 रन देत 10 विकेट्स घेतल्या. त्यानं पहिल्या इनिंगमध्येही 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि 66 रन काढले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं 45 रन काढले आणि सर्व 10 विकेट्स घेत टीमला 120 रननं मोठा विजय मिळवून दिला. IND vs NZ, Dream 11 Prediction: ‘या’ 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य सीनच्या भेदक बॉलिंगपुढे इस्टर्नसची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 65 रनवर आऊट झाली. सीननं या प्रकराची कामगिरी यापुढे देखील सुरु ठेवली तर त्याची लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय टीममध्ये निवड होऊ शकते.