मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अनुष्का रंजनच्या संगीतमध्ये Alia Bhatt चा डान्स, जबरदस्त डान्स करुन रंगवली मैफिल; Watch Video

अनुष्का रंजनच्या संगीतमध्ये Alia Bhatt चा डान्स, जबरदस्त डान्स करुन रंगवली मैफिल; Watch Video

Alia Bhatt Dance Video: या लग्नाच्या संगीत सोहळ्यात आलिया भट्टनं (Alia Bhatt)डान्स करून एक मैफिल रंगवली.

Alia Bhatt Dance Video: या लग्नाच्या संगीत सोहळ्यात आलिया भट्टनं (Alia Bhatt)डान्स करून एक मैफिल रंगवली.

Alia Bhatt Dance Video: या लग्नाच्या संगीत सोहळ्यात आलिया भट्टनं (Alia Bhatt)डान्स करून एक मैफिल रंगवली.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 21 नोव्हेंबर: गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडची मोस्ट पॉप्युलर एक्ट्रेस आलिया भट्ट (Alia Bhatt)हिच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहे. आलियानं अजून लग्न केलं नसलं तरी आता तिच्या मैत्रिणीच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. कारण या लग्नाच्या संगीत सोहळ्यात आलिया भट्टनं (Alia Bhatt)डान्स करून एक मैफिल रंगवली.

या गाण्यावर आलियानं केला डान्स

या कार्यक्रमात आलिया भट्ट आणि वाणी कपूरसह अनेक सेलिब्रिटी डान्स करताना दिसत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. येथे आलिया 'साथिया' चित्रपटातील 'चलका चलका रे' गाण्यावर डान्स करताना दिसली. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

येथे बघा डान्सचा व्हिडिओ

काल अनुष्का रंजन आणि आदित्य सील यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड एक्टर आणि एक्ट्रेसनी हजेरी लावली होती. अनुष्का रंजन आणि आदित्य सील दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघेही आज म्हणजेच 21 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत.

बॉलिवूड सिताऱ्यांची हजेरी

या दोन्ही कलाकारांच्या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूडचे अनेक मोठे चेहरे या कार्यक्रमाचा भाग बनले. या कार्यक्रमाचे अनेक सुंदर व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये आलियाशिवाय अनेक कलाकारही डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा- सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कचा पदार्फाश, 5 दहशतवाद्यांना अटक

अनुष्का रंजनच्या मेहंदीत आलिया भट्टचा No Makeup Look

नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला. ज्यामध्ये आलिया भट्ट, वाणी कपूरसोबत टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा क्रिस्टल डिसूझाही पोहोचली होती. अनुष्का रंजनच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंनंतर आता तिच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो समोर आले आहेत. या सोहळ्यादरम्यान अनुष्काची बहीण आकांक्षा रंजनची BFF (बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर) अभिनेत्री आलिया भट्टही पोहोचली होती. यादरम्यान ती नो मेकअप लूकमध्ये दिसली. यावेळी आलिया भट्टने लाल रंगाचा एथनिक आउटफिट कॅरी केला होता.

आलियाचा हा साधा अवतार लोकांना आवडला आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आलिया तिची मैत्रिण आकांक्षा रंजनसोबत दिसत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी पापाराझी विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. आलियाचा सिंपल लूक लोकांना आवडत आहे. लोक कमेंट करून तिला सिंड्रेला म्हणत आहेत. आणखी एका यूजरने लिहिले की, आलिया खूपच सुंदर दिसत आहे.

First published:

Tags: Alia Bhatt