जाहिरात
मराठी बातम्या / देश / Exclusive: गुलाम नबी आझाद म्हणाले, काँग्रेस संघटनेत बदलासाठी सोनिया गांधी तयार, नेतृत्वावर शंका नाही

Exclusive: गुलाम नबी आझाद म्हणाले, काँग्रेस संघटनेत बदलासाठी सोनिया गांधी तयार, नेतृत्वावर शंका नाही

Exclusive: गुलाम नबी आझाद म्हणाले, काँग्रेस संघटनेत बदलासाठी सोनिया गांधी तयार, नेतृत्वावर शंका नाही

काँग्रेसमध्ये राहून बळकट संघटना करण्याबाबत आम्ही बोलत आहोत. मात्र, पक्षात फूट पडलेली नाही, असं आझाद म्हणाले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावरूनही वाद नाही. नेतृत्वाचा मुद्दा निवडणुकीच्या वेळी दिसेल. आमच्या (G23 नेत्यांच्या) बैठका सतत सुरू असतात, यापुढेही सुरू राहतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 मार्च : काँग्रेसमधील (Congress) बंडखोर जी-23 गटाचे नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी ‘न्यूज 18 इंडिया’शी विशेष संवाद साधताना सांगितलं की, सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) त्यांच्या आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांवर विचार करण्यास सहमती दर्शवली आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाबाबत जी-23 नेत्यांच्या मनात कोणतीही शंका आणि वाद नाही. तसंच पक्षात फूट पाडण्यासारखी कोणतीही विचारसरणी नाही, असं ते म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अत्यंत खराब कामगिरीनंतर काँग्रेसच्या G-23 गटाच्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा मुद्दा पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे आला. G-23 सदस्य शशी थरूर, कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी यांनी उघडपणे काँग्रेस नेतृत्वात बदलाची मागणी केली. हे वाचा -  Corona मुळं नोकरी गेल्यानंतर मजूर झाला Youtube star, महिन्याला कमावले 3 लाख सोनिया गांधींनी आमच्या सूचना विचारात घेतल्या : आझाद G-23 नेत्यांच्या सूचनांबाबत गुलाम नबी आझाद यांनी 18 मार्च रोजी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. ‘न्यूज 18 इंडिया’शी झालेल्या फोनवरील संभाषणात गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेसला मजबूत करण्यासाठी संघटनेत बदल करण्याबाबत सोनिया गांधी आमच्या (G-23) सूचनांवर विचार करत आहेत. काँग्रेसचं संघटन मजबूत असावे, अशी सोनिया गांधींचीही इच्छा आहे. हे वाचा -  महिलेची जाळून हत्या; दलित असल्यानं लग्नाला नकार देत प्रियकरानंच काढला काटा काँग्रेसमध्ये फूट पडलेली किंवा पडणार नाही : आझाद काँग्रेसमध्ये राहून बळकट संघटना करण्याबाबत आम्ही बोलत आहोत. मात्र, पक्षात फूट पडलेली नाही, असं ते म्हणाले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावरूनही वाद नाही. नेतृत्वाचा मुद्दा निवडणुकीच्या वेळी दिसेल. आमच्या (G23 नेत्यांच्या) बैठका सतत सुरू असतात, यापुढेही सुरू राहतील. जी-23 च्या सदस्यांचा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे, असं यापूर्वी सांगण्यात येत होतं. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आझाद म्हणाले होते की, ज्या पक्षासाठी मी अर्ध्याहून अधिक आयुष्य आणि संपूर्ण तरुणपणातील कालावधी दिला आहे, तो पक्ष असा कोसळताना मी पाहू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात