Home /News /national /

Success Story : Corona च्या संकटामुळं नोकरी गेल्यानंतर मजूर झाला Youtube star, महिन्याला कमावले 3 लाख

Success Story : Corona च्या संकटामुळं नोकरी गेल्यानंतर मजूर झाला Youtube star, महिन्याला कमावले 3 लाख

या मजुरानं स्वतःचा एक व्हिडिओ बनवला आणि तो यूट्यूबवर अपलोड केला. तो हा व्हिडिओ टाकत असताना त्याला कल्पनाही नव्हती की तो लवकरच यूट्यूब स्टार होईल आणि त्याचे व्हिडिओ देशातच नाही तर परदेशातही पाहिले जातील.

    भुवनेश्वर, 18 मार्च - कठीण परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी झालेल्यांची अनेक उदाहरणं पहायला आणि ऐकायला मिळतात. कोरोनाच्या संकटामध्ये अनेकांच्या हातची कामं गेल्यामुळं त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. या काळात बांधकामं बंद पडल्यामुळं ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामध्ये रोजंदारी करणारे आणि हातावरचं पोट असलेले मजूर मोठ्या प्रमाणात होते. आता पुढील आयुष्य कसं असेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) 'आपत्तीत संधी' या सूत्रावर अनेकांनी टीका केली. तर, अनेकांनी तो आपला जीवनमंत्र मानला आणि त्याच्या आधारे पुन्हा सुरुवात केली. अशाच एका मजुरानं वेगळी वाट निवडत यूट्यूबवर नाव आणि पैसा दोन्ही कमावलं आहे. या मजुरानं स्वतःचा एक व्हिडिओ बनवला आणि तो यूट्यूबवर अपलोड (You Tube Upload) केला. तो हा व्हिडिओ टाकत असताना त्याला कल्पनाही नव्हती की तो लवकरच यूट्यूब स्टार होईल आणि त्याचे व्हिडिओ देशातच नाही तर परदेशातही पाहिले जातील. इसाक मुंडा असं या मजुराचं (odisha laborer isak munda) नाव असून ओडिशाचा रहिवासी आहे. त्याच्या या यशगाथेची सुरुवात अशा प्रकारे झाली - काम सुटल्यानंतर इसाक त्याच्या घरी बसला होता आणि त्याची मुलं फोनवर यूट्यूबवर कार्टून बघत होती. त्याच दरम्यान त्याला एक जाहिरात ऐकू आली, ज्यामध्ये लोक घरी बसून व्हिडिओ अपलोड करून पैसे कसे कमवू शकतात, हे सांगितलं जात होतं. इसाकला वाटलं की, त्याच्याकडं गमावण्यासारखं काही नाही. मग इथेही प्रयत्न का करू नये. अशाप्रकारे फक्त 7 वी पर्यंत शिकलेल्या इसाकनं (isak munda eating) पहिल्यांदा यूट्यूबवर चॅनल कसं बनवायचं हे शिकून घेतलं. मग तिथं असलेल्या ऑनलाइन क्लासेसपासून ते डान्सपर्यंतच्या सर्व श्रेणी पाहिल्यानंतर त्याला वाटलं की तो आपल्या गावाबद्दल, त्याच्या जीवनशैलीबद्दल आणि खाण्यापिण्याबद्दल सांगू शकेल. अशा प्रकारे त्यानं त्याचा पहिला व्हिडिओ तयार केला. यात तो तांदूळ, मसूर, भाजी, टोमॅटो आणि मिरची घेऊन बसला होता. त्यांनी हे जेवण खाऊन संपवलं आणि नंतर प्रेक्षकांचे आभार मानले. आठवडा उलटून गेल्यानंतरही त्याचा हा व्हिडिओ कोणी पाहिला नाही. इसाकनं हार मानली नाही आणि इतर YouTubers चे व्हिडिओ पाहिले आणि त्याला समजलं की या व्हिडिओंच्या प्रमोशनसाठी ते इतर सोशल मीडिया माध्यमांवर देखील टाकावे लागतील. त्याने फेसबुकवर अकाऊंट उघडून त्याचा व्हिडिओ टाकला. यावेळी त्याचा व्हिडिओ 10-12 लोकांनी पाहिला. त्यानंतर त्यानं ओडिशातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ, बासी पाखला म्हणजेच आंबलेल्या तांदळाच्या डिशचा आस्वाद घेत असल्याचा व्हिडिओ बनवला, जो व्हायरल झाला. काही दिवसातच त्याचे २० हजार सबस्क्राइबर्स झाले. इतकंच नाही तर, अमेरिका, ब्राझील, मंगोलियामध्येही त्याचे व्हिडीओ पाहिले गेले आणि कौतुकही झालं. दोन वर्षांनंतर, इसाक मुंडाच्या 'इसाक मुंडा ईटिंग' चॅनेलचे जवळपास 8 लाख सदस्य झाले आहेत आणि त्यांचा व्हिडिओ 100 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. खुद्द मुंडा आता कॅमेर्‍यासमोर सहजतेनं वावरत आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात त्याची चर्चा केली होती. यावरून त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज लावता येतो. मुकबांग (Mukbang) श्रेणानं स्टार बनवलं यूट्यूबवर मुकबांग (Mukbang) नावाची एक श्रेणी आहे. यामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर अन्न खातात आणि लोकांची मतं घेतात. हे पहिल्यांदा 2010 मध्ये दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये सुरू झालं. मग हळूहळू ते जगभर प्रसिद्ध झालं. मुकबंग चॅनेलचे जगभरात कोट्यावधी सदस्य आहेत, ज्यात भारतातील मॅडीइट्स आहेत. मुंडा यांना या वर्गवारीबद्दल काहीही माहिती नसल्यानं ते वेगवेगळ्या चॅनेलवर त्यांचे व्हिडिओ पोस्ट करत राहिले. नंतर त्यांना या श्रेणीबद्दल माहिती मिळाली. या संपूर्ण प्रवासात यूट्यूब हाच त्यांचा शिक्षक होता. यातून कॅमेरा विकत घेण्यापासून ते व्हिडिओ बनवण्यापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण त्यांनी घेतलं. त्यांनी हे काम सुरू केलं तेव्हा त्यांच्याकडे फक्त 3 हजार रुपये शिल्लक होते. यातून त्यांनी आपलं काम सुरू केलं. आता ते प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ बनवत नाहीत. त्याऐवजी ते यासाठी खास दिवस निवडतात. जसं गावात एखादी पार्टी असेल किंवा काही खास कार्यक्रम असेल. त्यात कोणताही टेक्सचर नसल्यामुळं अनेकांना त्याचे व्हिडिओ आवडतात. तर, इसाकला अन्नाचं मूल्य माहीत आहे आणि त्यांच्या मनात अन्नाविषयी आदर आहे, म्हणून देखील काही लोकांना त्याचे व्हिडिओ आवडतात. मुलांचं भविष्य इसाक रोजंदारीवर काम करत असतना त्याचं रोजचं उत्पन्न 250 रुपये होतं. त्याला महिन्यातून 18-20 दिवस काम मिळायचे. त्यांच्या पालकांसह सहा जणांच्या कुटुंबासाठी इतका पैसा काहीच नव्हता. मात्र त्यांचे चॅनल प्रसिद्ध झाल्यापासून त्यांची कमाई महिन्याला ३ लाख रुपयांवर पोहोचली. आता त्याचे प्रेक्षक कमी झालेत. त्यामुळं त्याला महिन्याला 60-70 हजार रुपये मिळत आहेत. या पैशातून त्यानं दुमजली घर बांधलंय. तो आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसेही वाचवत आहे. इतकंच नाही तर, त्यानं एक सेकंड हँड कारही घेतली असून व्हिडिओ एडिट करण्यासाठी त्याच्याकडे लॅपटॉपही आहे. आता मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांचं जीवन अधिक चांगलं व्हावं, अशी इसाकची इच्छा आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Success story, Youtube, Youtubers

    पुढील बातम्या