Home /News /national /

इंजिनीअर तरुणीची जाळून हत्या; दलित असल्यानं लग्नाला नकार देत प्रियकरानंच काढला काटा, कुटुंबीयांचा आरोप

इंजिनीअर तरुणीची जाळून हत्या; दलित असल्यानं लग्नाला नकार देत प्रियकरानंच काढला काटा, कुटुंबीयांचा आरोप

अहमदनगर जिल्ह्यातील तारकपूर भागात ही घटना घडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील तारकपूर भागात ही घटना घडली आहे.

दानेश्वरीच्या प्रियकरानेही इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. इलेक्ट्रॉनिक सिटीत ते राहतात. तिच्या जातीमुळे आई-वडील त्यांचं नातं कधीच मान्य करणार नाहीत, असं सांगून त्यानं लग्नास नकार दिला.

    बंगळुरू, 18 मार्च : एका सुशिक्षित तरुणीची तिच्या प्रियकरानं जाळून हत्या केल्याचं प्रकरण समोर आलंय. या घटनेत दानेश्वरी या 23 वर्षीय दलित मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ती दोन दिवस जगण्यासाठी झुंजत होती. ती दलित असल्यानं तिच्याशी लग्नाला नकार देत तिच्या प्रियकरानेच ही हत्या केल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना मंगळवारी (ता. 15 मार्च) बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये घडली. त्यानंतर दानेश्वरीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. 2 दिवसांच्या त्रासानंतर गुरुवारी तिचा मृत्यू झाला. दानेश्वरी ही बीटीएम लेआऊटची रहिवासी होती, जिथे ती एक कोर्स करत होती. या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पवन यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं की, "या प्रकरणाचा तपास सुरू असून ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, दानेश्वरीचा प्रियकर आणि मुख्य संशयित शिवकुमारचा शोध सुरू आहे.' आरोपी शिवकुमार यानं दानेश्वरीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पीडितेची बहीण तेजस्विनी हिनं शिवकुमारविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. हे वाचा - गोव्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,एका अभिनेत्रीसह 3 महिलांची सुटका आरोपी आणि पीडितेनं विजयपुरा जिल्ह्यात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते बंगळुरूला गेले. तक्रारीनुसार, आरोपीनं दानेश्वरीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. मात्र, जेव्हा पीडितेने लग्नाची चर्चा सुरू केली तेव्हा आरोपीनं तिला सांगितले की, तो आई-वडिलांची संमती घेऊन तिच्याकडे परत येईल. हे वाचा - 30 वर्षांनंतर विद्यार्थ्यानं घेतला सूड : तब्बल 101 वार करत केली शिक्षिकेची हत्या त्यानंतर त्यानं दानेश्वरी ही दलित समाजातील आहे आणि त्याचे आई-वडील त्यांचं नातं कधीच मान्य करणार नाहीत, असं सांगून त्यानं दानेश्वरीशी लग्न करण्यास नकार दिला. आरोपींनी दानेश्वरीला एका निर्जन स्थळी बोलावून तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. वृत्तानुसार, शिवकुमार यानं पीडितेला जवळच्या रुग्णालयात नेलं आणि काही वेळातच तो पळून गेला. आरोपी गेल्या तीन दिवसांपासून फरार आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Bengaluru, Crime news, Murder

    पुढील बातम्या